---Advertisement---

‘दादा’ गिरी! ट्रोल झाल्यानंतरही गांगुली यांनी पुन्हा पोस्ट केले ‘ते’ छायाचित्र

On: बुधवार, जून 9, 2021 2:01 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळवण्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली आहे. या आयोजनासाठीच्या विविध विषयांवरील चर्चांसाठी बीसीसीआयचे वरीष्ठ पदाधिकारी यूएईमध्ये आहेत. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा देखील समावेश आहे. दुबईमध्ये असलेल्या गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून एक छायाचित्र पोस्ट केले होते, मात्र चाहत्यांनी ट्रोल केल्यामुळे त्यांनी ते छायाचित्र हटवलेले. परंतु, गांगुली यांनी पुन्हा तेच छायाचित्र पोस्ट केले आहे.

गांगुली झाले होते ट्रोल
सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये कार रेसिंग करण्याचा आनंद लुटला होता. त्याचे एक छायाचित्र त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून पोस्ट केलेले. मात्र, काही चाहत्यांनी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे, असे म्हणत ट्रोल केले होते. दोन महिन्यांपूर्वी हृदयाचा त्रास जाणवल्याने गांगुली यांना दवाखान्यात भरती करण्यात आलेले व त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. चाहत्यांच्या प्रतिक्रियेनंतर हे छायाचित्र त्यांनी हटवलेले.

पुन्हा पोस्ट केले ते छायाचित्र
ट्रोल झाल्यानंतर हटवले गेलेले छायाचित्र गांगुली यांनी पुन्हा एकदा पोस्ट केले आहे. त्याला कॅप्शन देत त्यांनी लिहिले, ‘मला समजले नाही हे कसे काय डिलीट झाले होते. पुन्हा पाहा’ या छायाचित्रात गांगुली रेसिंगला जाताना दिसतायेत. त्यांनी हातामध्ये हेल्मेट पकडलेले दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CP2nlWYA1cU/

आयपीएल आयोजनाला आयसीसीचा खो
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सर्व पदाधिकारी आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. ही स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाईल. मात्र, यादरम्यान, या वेळापत्रकाला आयसीसीचा आक्षेप असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीला आयपीएल २०२१ ही १५ ऑक्टोबरपर्यंत खेळवण्याची इच्छा नाही. आयसीसी टी२० विश्वचषक १८ ऑक्टोबरपासून सुरू करू इच्छित आहे. त्यामुळे, आयपीएल विश्वचषकाच्या कमीतकमी ८ दिवस आधी म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत संपवावी, असे आयसीसीने म्हटले. या कारणाने येत्या काही दिवसांत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आणि आयसीसी समोरासमोर येऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या –

“हे भारताचे मागील २० वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण”

कलम ३७० चा भारतीय वाहिन्यांना बसणार आर्थिक फटका? क्रिकेट प्रक्षेपणासाठी भारतीय कंपन्यांना दिला नकार

इंग्लंडसाठी सर्वात मोठा विक्रम करण्यापूर्वी अँडरसन झाला भावूक; म्हणाला, ‘वाटले नव्हते की मी या शिखरावर पोहोचेल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---