भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, सौरव गांगुली यांचा आज (8 जुलै) 51 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या या क्रिकेटपटूला संपूर्ण जगात ‘दादा’ या नावाने संबोधले जाते. भारतीय संघाच्या कर्णधारपदी चांगली कामगिरी केल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष म्हणूनही आपली जबाबदारी चोख पार पाडली. सौरव गांगुली यांचे कुटुंब बंगालच्या सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे. कोलकातामध्ये त्यांचे 65 वर्ष जुने घर आहे, ज्यामध्ये एकूण 48 खोल्या आहेत.
कोलकात्यातील सर्वात श्रीमंत कुटुंब
सौरव गांगुली यांचा जन्म 8 जुलै 1972 रोजी कोलकातामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव चंडीदास आणि आईचे नाव निरुला आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध प्रिंटिंग व्यावसायीक होते. गांगुली कुटुंब हे कोलकात्यातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. तसेच सौरव गांगुलीला ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ देखील म्हटले जाते. (Sourav Ganguly birthday take a look of bcci presidents mansion in kolkata)
गांगुलीच्या घराचा पत्ता
कोलकाता शहरात गांगुलीचे आलीशान 48 खोल्या असलेले घर आहे. हे घर कोलकात्यातील बिरेन रॉय रस्त्यालगत आहे. या घराचा क्रमांक 2/6 आहे. तर पिनकोड 700034 असा आहे. या आलिशान घरात सौरव गांगुली आपली पत्नी डोना आणि मुलगी सनासोबत राहतात.
https://www.instagram.com/p/B8O8sYrlXKM/?utm_source=ig_web_button_share_sheet
48 खोली असलेले आलिशान महाल
कोलकात्यातील ज्या घरात सौरव गांगुली राहतात. त्या चार माळ्याच्या घरात एकूण 48 खोल्या आहेत.
https://www.instagram.com/p/B6zcBPbgc6S/?utm_source=ig_web_button_share_sheet
बंगालच्या संस्कृतीची झळकते झलक
या घराच्या अंतर्गत भागातील संपूर्ण काम बंगाली संस्कृती आणि कलेचा वापर करून केले गेले आहे. याशिवाय संपूर्ण घरात लाकडी वस्तूंनी अद्भुत सजावट केली गेली आहे. ‘कोलकाताचा राजकुमार’ सौरव गांगुली हे घर सोडून इतर कोठेही राहण्याचा कधीही विचार केला नाही.
https://www.instagram.com/p/CLYw4DJAEav/?utm_source=ig_web_button_share_sheet
कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते
सौरव गांगुली यांना आपल्या घरात राहायला खूप आवडते. सामना झाल्यानंतर ते घरातच आपला वेळ घालवत असतात. बीसीसीआय अध्यक्ष झाले असले तरीही ते वेळ मिळताच इथे हजेरी लावत असतात.
https://www.instagram.com/p/CAc5xLPA4Ko/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CHk-MW6AQZt/?utm_source=ig_web_button_share_sheet
भलामोठा लिविंग रूम
सौरव गांगुलीच्या या आलिशान घरात भले मोठे लिविंग रूम आहे. कुटुंबातील सदस्य या रुममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतात. या रुममध्ये भलामोठा टीव्ही आहे, जिथे सौरव गांगुली क्रिकेटचा सामना पाहतात.
घरातच आहे क्रिकेट खेळपट्टीपासुन ते जिमची सुविधा
सौरव गांगुलीच्या घरात एक क्रिकेटची खेळपट्टी देखील आहे. परंतु ते आता इथे खेळत नाहीत. या घरात मोठी जिम आहे. तसेच त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मिळवलेले सर्व पुरस्कार आणि ट्रॉफी एका रुममध्ये ठेवले आहेत.
https://www.instagram.com/p/CFtdShoAzxD/?utm_source=ig_web_button_share_sheet
आईच्या आवडीची ठेवली जाण
त्यांचे अतिशय सुंदर आहे. सौरव गांगुलींच्या आईला पांढरा रंग खूप आवडायचा. त्यामुळे त्यांच्या घरातील भिंतीना हलके रंग लावण्यात आले आहेत.
https://www.instagram.com/p/COpR3G-gbd8/?utm_source=ig_web_button_share_sheet
बैठकीचा एरिया
सौरव गांगुलीच्या घरात मीटिंग करण्यासाठी एक विशिष्ट रूम देखील आहे. इथे बसून सौरव गांगुली आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत गप्पा मारत असतात. इथेच बसून ते वृत्तपत्र वाचण्याचा आनंद घेत असतात.
महत्वाच्या बातम्या –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन ‘त्यांनी’ गांगुलीला रडवले