---Advertisement---

‘हा’ भारतीय खेळाडू बनेल कसोटी क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार! सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी

On: बुधवार, जून 11, 2025 4:21 PM
Sourav-Ganguly
---Advertisement---

Sourav Ganguly Statement On Shubman Gill: भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात 20 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान सर्वांच्या नजरा गिलवर असतील. रोहित शर्मानंतर गिलला नवा कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे. (Shubman Gill New Test Captain India) अशा परिस्थितीत, इंग्लंडमधील 5 सामन्यांची कसोटी मालिका गिलसाठी चांगली कामगिरी करण्याची योग्य संधी आहे. अशी प्रतिक्रिया भारताच्या माजी कर्णधाराने दिली आहे.

सौरव गांगुली गिलबद्दल म्हणाले, “कोहलीने अशाच कठीण परिस्थितीत भरपूर धावा करून आपले नाव कमावले. जर गिल खंबीरपणे उभा राहिला आणि आघाडीवरून नेतृत्व केले तर लोक त्याला एक हिरो म्हणून पाहतील आणि भूतकाळातील कमतरता विसरून जातील.”

सौरव गांगुली नवीन कर्णधार शुबमन गिलबद्दल बोलताना म्हणाला, “कसोटी फलंदाज म्हणून त्याला अजूनही काही काम करायचे आहे, अशा परिस्थितीत त्याला धावा काढण्याची आवश्यकता आहे. तो एक युवा कर्णधार आहे आणि तो शिकेल. कल्पना करा की जर तो चांगली कामगिरी करत असेल तर ते किती चांगले होईल? त्याला हिरो म्हणून गौरवले जाईल. एक खेळाडू म्हणून, तुम्ही अशा परिस्थितींसाठी जगता.”

इंग्लंडविरुद्ध भारत कसोटी मालिका वेळापत्रक! (India vs England Test squad schedule)

पहिला कसोटी सामना 20 ते 24 जून हेडिंग्ले, लीड्स
दुसरा कसोटी सामना 2 ते 6 जुलै एजबेस्टन, बर्मिंगहॅम
तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै लॉर्ड्स, लंडन
चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट द ओव्हल, लंडन

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ- शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव (India’s Test squad for England tour)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---