भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (bcci) चा अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) मागच्या काही दिवसांपासून सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि गांगुली यांच्यासंदर्भात अनेक बातम्या अलिकडच्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. अशातच गांगुलींनी कर्णधार विराटविषयी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही प्रतिक्रिया गुरुग्राममध्ये आयोजित एका कार्यक्रमात दिली आहे.
गुरुग्राममध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी गांगुली उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात त्यांना प्रश्न विचारला गेला की, कोणत्या खेळाडूची वृत्ती (एटीट्यूड) त्यांना आवडतो. या प्रश्नाचे उत्तर देताना गांगुलींनी विराट कोहलीचे नाव घेतले, पण सोबतच विराटची एक वाईट सवय देखील सांगितली. ते म्हणाले, ‘त्यांना विराटचा एटीट्यूड आवडतो, पण तो भांडणं खूप करतो.’
कार्यक्रमादरम्यान त्यांना पुढे प्रश्न विचारला गेला की, तुम्ही तुमच्या आयुष्यातील तणावाला कसे सामोरे जाता? या प्रश्नचे उत्तर देताना गांगुलींना एक मजेशीर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘माझ्या आयुष्यात कोणताच ताण नाहीय, परंतु हो. पत्नी आणि प्रेयसी नेहमीच ताण देतात.’
दरम्यान, विराट कोहलीने दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर गांगुली आणि विराटमधील मतभेद जगासमोर आले होते. विराटने टी-२० विश्वचषकानंतर स्वतःच्या इच्छेने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि ही जबाबदारी रोहित शर्माकडे आली होती. त्यानंतर बीसीसीआयने दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी एकदिवसीय संघाचे कर्णधारपद विराटकडून काढून रोहित शर्माकडे सोपवले.
मर्यादित षटकांमध्ये कर्णधारपद एका खेळाडूकडे असने योग्य ठरते, असे बीसीसीआयने यामागचे कारण सांगितले होते. सौरव गांगुलींनी याबाबत बोलताना सांगितले होते की, त्यांनी विराटला टी-२० कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती आणि तरीही त्याने ते सोडले. परंतु विराटच्या म्हणण्याप्रमाणे टी-२० कर्णधारपद सोडण्यापूर्वी कोणीही त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला नव्हता. या संपूर्ण प्रकरणानंतर विराट आणि गांगुली यांच्यातील गोंधळ जगासमोर आला होता आणि याबाबतीत अनेक बातम्या समोर आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
पेहचान कोण? कांबळींनी शेअर केला युवा वयातील फोटो, सचिनला सोडून इतरांना ओळखणं महाकठीण
क्रिकेटवेडा स्मिथ! रात्रीच्या १ वाजता नवीन बॅटने करत होता शॅडो प्रॅक्टिस, पत्नीने व्हिडिओ केला शेअर