भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीला पुन्हा एकदा ओपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याने बुधवारी(२७ जानेवारी) छातीत वेदना होण्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
काहीदिवसांपूर्वीच ३ जानेवारीला सकाळी जिममध्ये व्यायाम करताना गांगुलीने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी पण करण्यात आली होती. त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात ३ ब्लॉकेजेस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याला घरी देखील सोडले होते.
सौरव गांगुलीची कारकिर्द –
बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १९९२ ते २००८ या कालावधीत भारताकडून क्रिकेट खेळले आहे. दरम्यान त्याने ३११ वनडे सामने खेळले असून ११३६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११३ सामने खेळले असून ७२१२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने एक द्विशतक आणि १६ शतके लगावली आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची २०१९ साली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवड झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
Video : कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे खेळाडू चेन्नईत पोहचले; खेळाडूंची झाली कोविड चाचणी
ब्रेकिंग! आयपीएल २०२१ लिलावाची तारीख आणि ठिकाण ठरले; फेब्रुवारीत ‘या’ दिवशी होणार लिलाव
प्रत्येक महिन्यात मिळणार सर्वोत्तम क्रिकेटपटू; आयसीसीकडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर