कोरोना संक्रमित आढळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) (bcci president Sourav Ganguly) सौरव गांगुली यांना कोलकाताच्या वुडलॅन्ड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अशात त्यांच्या आरोग्याविषयी अधिक माहिती समोर आली आहे. गांगुलींची आरोग्य स्थिर आणि ठीक असल्याचे सांगितले जात आहे. आता ते पुढचे काही दिवस रुग्णालयात राहतील अशी माहीत आहे. गांगुलींच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी समजली जात आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार गांगुलींनी काल रात्री चांगल्याप्रकारे विश्रांती घेतली आहे. आता सध्या त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षण दिसत नाहीत. त्यांचा ऑक्सिजन स्तर आणि इतर चाचण्यांचे अहवाल सामान्य आले आहेत. अशात त्यांच्याविषयी चिंता करण्याची कोणतेच कारण नाही. असे असले तरी, रुग्णालयातील डॅक्टर सतत त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवून आहेत.
गांगुलींनी यापूर्वी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याची दोन वेळा कोरोनाची चाचणी करण्यात आली होती आणि दुसऱ्या चाचणीवेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालयानेही गांगुलींच्या आरोग्याविषयी माहितीचे निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या आरोग्याला जरी काही धोका नसला, तरी कोरोना लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
दरम्यान, २०२१ वर्ष गांगुलींसाठी आरोग्याच्या दृष्टीने काही खास राहिले नाही. त्यांना यावर्षी दोन ते तीन वेळा रुग्णालयात भरती केले गेले. यावर्षीच्या सुरुवातीला देखील त्यांना रुग्णालयात भरती केले गेले होते. त्यावेळी त्यांच्या ह्रदयात वेदना होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले गेलेले. नंतर त्यांच्या ह्रदयात काही समस्या आढळली होती आणि एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस गांगुलींना डॉक्टरांच्या निरीक्षणात रुग्णालयात ठेवले गेले होते. एकदा तब्येत ठीक झाल्यावर त्यांनी पुन्ही बीसीसीआयची धुरा स्वतःच्या हातात घेतली होती.
बीसीसीआय सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. पुढच्या आयपीएल हंगामात दोन नवीन संघ सामील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात मेगा लिलावाचे आयोजन केले जाणार आहे. परंतु बीसीसीआयकडून याबाबत अजूपर्यंत कसलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.
महत्वाच्या बातम्या –
परदीपची कमाल! पिछाडीवरून यूपीने साधली गुजरातविरुद्ध बरोबरी
‘नवीन एक्सप्रेस’ची ऐतिहासिक कामगिरी! दबंग दिल्लीकडून गतविजेता बंगाल नामोहरम
वरिष्ठ ऑस्ट्रेलियन म्हणतोय, “भारतात कसोटी मालिका जिंकूनच निवृत्त होईल!”
व्हिडिओ पाहा –