---Advertisement---

‘दादा’च्या ‘त्या’ एका फोनवर मिळाली गरीब कुटुंबाला मदत; झाली कोरोना चाचणी

On: मंगळवार, जुलै 28, 2020 11:43 AM
---Advertisement---

कोलकाता। भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला समस्त क्रिकेट जगतात ‘दादा’ या नावाने ओळखले जाते. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लोकांना चिंतेत टाकले आहे. अशामध्ये गांगुलीने गरजू व्यक्तींना मोठ्या भावाप्रमाणे मदतीचा हात दिला आहे.

कोरोना व्हायरसदरम्यान ‘दादा’च्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. गांगुलीच्या प्रयत्नांमुळे एका गरीब कुटुंबाची कोरोना चाचणी होऊ शकली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, बंगालच्या हुगली (Hooghly) जिल्ह्यातील चुंचूडा भागातील कदमतलामधील कनकशालीच्या वाशिंदा सौरव बसूचा कोरोना व्हायरसमुळे रविवारी (२६ जुलै) मृत्यू झाला होता.

बसूची पत्नी सुष्मिता बसू आणि २ मुलांमध्येही कोरोनाची लक्षणे होती. सुष्मिता स्वत:ची आणि आपल्या मुलांची कोरोना चाचणी करण्यासाठी इकडे-तिकडे भटकत होती. परंतु बसू कुटुंबाच्या एका मित्राच्या माध्यमातून ही गोष्ट गांगुलीपर्यंत पोहोचली. यानंतर गांगुलीने चुंचूडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) अरिंदम विश्वास यांचा नंबर घेत त्यांच्याशी संपर्क साधला. गांगुलीने यापूर्वी त्यांना मेसेज करत आपला परिचय दिला आणि काही वेळानंतर त्यांना फोन केला.

गांगुलीच्या एका फोनमुळे एसडीपीओ दंग झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या भागातील एका कुटुंबासाठी गांगुली फोन करत आहे. गांगुलीने एसडीपीओ यांना त्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्याची विनंती केली. एसडीपीओकडून त्यांना सोमवारी (२७ जुलै) संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळातही गांगुली गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहे. यापूर्वी त्याने ५० लाख रूपयांचे तांदळाचे वाटपही केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक

-ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम

-मोहम्मद आमिर इंग्लंडला जाण्याच्या लायकीचा नाही

ट्रेंडिंग लेख-

-पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती

-वाढदिवस विशेष- ४९ वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…

-वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या १० गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---