आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्यासाठी शेवटची स्पर्धा ठरली. रवी शास्त्रींनंतर पुढील मुख्य प्रशिक्षक कोण? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावेळी राहुल द्रविडला या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. आता बीसीसीआयने अधिकृत घोषणा करत राहुल द्रविडला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोपवले आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट मालिकेतून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळास सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडबद्दल एक मजेशीर वक्तव्य केले आहे.
राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले की, “मला राहुल द्रविडच्या मुलाच्या फोन आला होता. त्याने मला सांगितले होते की, त्याचे वडील राहुल द्रविड खूप कडक शिस्तीचे आहेत आणि त्यांना दूर करणे गरजेचे आहे. त्यावेळी मी राहुल द्रविडला फोन केला आणि म्हटले की, आता राष्ट्रीय संघात समाविष्ट होण्याची वेळ आली आहे.”
तसेच सौरव गांगुली यांनी खुलासा करत असेही म्हटले होते की, “आम्ही एकत्र मोठे झाले आहोत, एकत्रच कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि जास्तीत जास्त वेळ एकत्र खेळण्यात घालवला होता. त्यामुळे मला त्याचे स्वागत करणे खूप सोपे वाटले होते.” राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी गेली अनेक वर्ष भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला असून १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेत तो भारतीय संघाला मार्गदर्शन करताना दिसून येणार आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
नव्या टी२० विश्वविजेत्यांचं कौतुक! क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर शुभेच्छांचा पाऊस, पाहा ट्वीट्स