---Advertisement---

आयपीएलची तयारी पाहून सौरव गांगुली खूश; चक्क स्टेडियमवर जाऊन…

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 10:29 AM
---Advertisement---

मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलची तयारी पाहून आनंदी झाले आहेत. ते सोमवारी युएईच्या शारजाह स्टेडियमवर दाखल झाले. कोरोनामुळे आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. सर्व 60 सामने दुबई (24), अबूधाबी (20) आणि शारजाह (12) येथे होतील.

गांगुलीने शारजाह स्टेडियमवर स्वत: जाऊन कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी जैव-सुरक्षित वातावरणात होणार्‍या स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. ते म्हणाले की, ‘युवा खेळाडू या मैदानावर खेळण्यास उत्सुक आहेत, जिथं सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूंनी इतिहास रचला आहे.’

https://www.instagram.com/p/CFH901CgyZT/

शारजाह स्टेडियम सामन्यासाठी सज्ज

अलीकडेच शारजाह स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. यात कृत्रिम छप्पर घालणे, रॉयल सुट श्रेणीसुधारित करणे तसेच कॉमेंट्री बॉक्स आणि आतिथ्य बॉक्स कोरोनाशी संबंधित नियमांनुसार तयार केले गेले आहेत.

आयपीएलमध्ये सुमारे 20 हजार कोरोना टेस्ट होणार

या वेळी स्पर्धेच्या प्रत्येक 5 व्या दिवशी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचा-यांची कोरोना टेस्ट केली जाईल. एकूण 20 हजार कोरोना टेस्ट होतील. यासाठी बीसीसीआय 10 कोटी रुपये खर्च करेल. बुधवारपर्यंत 3500 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.  आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात 19 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---