भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या स्टार वॉरचे आता सत्तासंघर्षात रूपांतर होत आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी कसोटी कर्णधाराला बोर्डाच्या ताकदीची जाणीव करून देण्यासाठी तयारी केली आहे. असे संकेत देताना त्यांनी म्हटले आहे की, बोर्ड विराट कोहलीचे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळेल.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने (Virat Kohli Press Conference) दावा केला होता की, बीसीसीआयने त्याला टी२० चे कर्णधारपद सोडण्यापासून परावृत्त केले नाही. हा दावा बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानाच्या अगदी विरुद्ध होता. विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुली यांनी सांगितले होते.
विराटच्या या वक्तव्यामुळे गांगुली नाराज असल्याचे समजते आहे. गांगुली यांनी गुरुवारी आणखी एक मोठे विधान केल्याने याचे संकेतही मिळाले आहेत. विराटचे प्रकरण लोकांनी बीसीसीआयवर सोडावे, असे ते म्हणाले. मंडळ आपल्या पद्धतीने याला सामोरे जाईल. (Virat- Ganguly Controversy)
बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रोहित शर्माची वनडे आणि टी२० संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली. विराटला वनडेचे कर्णधारपद सोडायचे नव्हते. यावर गांगुली म्हणाले की, बोर्डाने सप्टेंबरमध्येच त्याला सांगितले होते की, जर त्याने टी२० कर्णधारपद सोडले तर त्याला वनडेमध्ये कायम ठेवणे कठीण होईल. गांगुलींच्या म्हणण्यानुसार, विराटने तसे करण्यास नकार दिला आणि त्यानंतर बीसीसीआयकडे विराटकडून वनडे कर्णधारपद काढून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. गांगुलींच्या मते, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार असू शकत नाहीत.
गुरुवारी पत्रकार परिषदेत गांगुलींना विराट कोहलीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ”मी या विषयावर भाष्य करणार नाही. मंडळ आपल्या पद्धतीने हे प्रकरण हाताळेल.” त्यामुळे बीसीसीआय विराटच्या प्रकरणावर कठोरता दाखवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे हा स्टीव्ह स्मिथ की मायकल जॅक्सन? व्हिडिओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
टी२०तील एकाहून एक मातब्बर फलंदाजांना पुरून उरला पाकिस्तानचा रिझवान, केला ‘हा’ विश्वविक्रम