पुणे| पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2021 स्पर्धेत स्कायलार्कस, डॉल्फिन्स, टस्कर्स या संघांनी सलग दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अंकुश जाधव(नाबाद 28धावा व 1-3) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्कायलार्कस संघाने वुल्वस संघाचा 6 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. देवेंद्र चितळे(3-3 व 23 धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डॉल्फिन्स संघाने विअर वुल्वस् संघाचा 37 धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंदकेली
अन्य लढतीत हर्षल गंद्रेच्या नाबाद 36 धावांच्या जोरावर टस्कर्स संघाने स्वोजस टायगर्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. सिद्धार्थ बदामीकरच्या नाबाद 41 धावांच्या खेळीच्या जोरावर कोतवाल युनिकॉर्न संघाने रावेतकर बुल्स संघाचा 8गडी राखून पराभव केला.
निकाल साखळी फेरी:
वुल्वस:6षटकात 4बाद 56धावा(हर्षा जैन 21(11), गौरव कासट नाबाद 17, अंकुश जाधव 1-3, दर्शन कांकरियाल 1-8, अर्जुन माहुली 1-16)पराभूत वि. स्कायलार्कस: 4षटकात 2बाद 49 धावा(अंकुश जाधव नाबाद 28(15,2×4,2×6), इशांत रेगे नाबाद 14, प्रसाद जाधव 11, आयुष जगताप 1-14);सामनावीर-अंकुश जाधव; स्कायलार्कस संघ 6 गडी राखून विजयी;
डॉल्फिन्स:6षटकात 4बाद 76धावा(आशिष राठी 32(15, 3×4,2×6), देवेंद्र चितळे 23(12,2×4,1×6), अभिजीत गानू 8, जयदीप गोडबोले 1-7, ईशान तळवलकर 1-7)वि.वि.विअर वुल्वस्: 6षटकात6बाद 39धावा(जयदीप गोखले 17, देवेंद्र चितळे 3-3, राजेश राठोड 3-11);सामनावीर-देवेंद्र चितळे; डॉल्फिन्स संघ 37 धावांनी विजयी;
बुल्स: 6षटकात 2बाद 71धावा(श्रीनिवास चाफळकर 53(17,3×4,6×6), प्रशांत वैद्य नाबाद 13, अभिषेक जाधवराव 1-10) पराभूत वि. युनिकॉर्न: 4.2षटकात बिनबाद 72धावा(सिद्धार्थ बदामीकर नाबाद 41(15,2×4,4×6), इंद्रजीत नाबाद 27(11,3×4,1×6));सामनावीर-सिद्धार्थ बदामीकर; युनिकॉर्न संघ 8गडी राखून विजयी;
टायगर्स: 6षटकात 3बाद 57धावा(मधुर इंगळहलीकर 20(16), अभिषेक ताम्हाणे 16, शार्दूल वाळिंबे नाबाद 14, कल्पक पत्की 1-7)पराभूत वि.टस्कर्स: 4.1षटकात 1बाद 59धावा(हर्षल गंद्रे नाबाद 36(12,3×4,3×6), कर्ना मेहता नाबाद 19(11,1×4,1×6), सोहन अनगळ 1-8); सामनावीर-हर्षल गंद्रे; टस्कर्स संघ 7 गडी राखून विजयी;
स्कायलार्कस: 6षटकात 4बाद 87धावा(अनुज साबडे 38(13,3×4,4×6), प्रसाद जाधव 34(16,4×4,2×6), योगेश भोंगळे 1-16, अक्षय कश्यप 1-12) वि.वि. चिताज: 6षटकात 2बाद 75धावा(अनवीर नाना नाबाद 42(18,4×4,3×6), प्रतीक वांगीकर 30(16, 4×6), अंकुश जाधव 1-9, प्रशांत सुतार 1-4);सामनावीर-अनुज साबडे; आर्यन स्कायलार्कस संघ 12धावांनी विजयी;
विअर वुल्वस्: 6षटकात 6बाद 56धावा(कृष्णा मेहता 18, ईशान तळवलकर 11, केदार जोशी 1-14, आर्यन देसाई 1-7, आशिष देसाई 1-9, नील गोवईकर 1-13)पराभूत वि.पँथर्स: 5.1षटकात 3बाद 57 धावा(नहूश जाधव 22(11), अनुज मेहता नाबाद 10, आकांशजैन 2-19, कृष्णा मेहता 1-12);सामनावीर-आर्यन देसाई; पँथर्स संघ 5 गडी राखून विजयी.
महत्त्वाच्या बातम्या-
सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ
रोहितची दुखापत ‘या’ फलंदाजाच्या पडली पथ्यावर; विराट शिक्कामोर्तब करत म्हणाला, ‘मयंकसोबत तो सलामी..’