भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष असणारे सौरव गांगुली, लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करताना दिसू शकतात. लिजेंड्स लिग क्रिकेटचा दुसरा हंगाम यावर्षी खेळला जाणार असून सौरव गांगुली या स्पर्धेत खेळणार असल्याचे समोर येत आहे.
क्रिकेटसाठी योगदान दिलेल्या माजी दिग्गजांसोबत सौरव गांगुली (Sourav Ganguly) यावर्षी लिजेंड्स लीग क्रिकेट खेळणार असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. गांगुलींनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, ते ज्या सामन्यात खेळणार आहेत, तो एक चॅरिटी सामना असेल. या सामन्यात चाहते मोठ्या काळानंतर गागुलींना मैदानात फलंदाजी करताना पाहतील.
हा सामना भारताच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोस्तव म्हणजेच ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे खेळवला जाईल. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ आयोजित चॅरिटी सामन्यात सज्ज राहण्यासाठी तयारी सुरू आहे. मी या तयारी आणि प्रशिक्षणाचा आनंद घेत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. महिला सशक्तिकरणासाठी दिग्गजांसोबत लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये लवकरच काही चेंडू खेळायचे आहेत.”
https://www.instagram.com/p/CgmM7PmtxH0/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, सौरव गांगुलींच्या कारकिर्दीचा विचार केला, तर ते सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेत कार्यरत असलेली बीसीसीआय जगातील सर्वोत श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. गांगुलींना त्यांचा शेवटचा क्रिकेट सामना ७ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये खेळला होता. तेव्हा ते सचिन्स ब्लास्टर्स संघाकडून खेळले होते. हा सामना लॉस एंजिलिसमध्ये पार पडला होता.
या सामन्यात गांगुलींना ३७ चेंडू खेळले आणि अर्धशतक ठोकले होते. सौरव गांगुलींनी भारतीय संघासाठी एकूण ११३ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी ७२१२ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३११ सामन्यांमध्ये गागुलींना देशाचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ११३६३ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शाहरूख खानने अवघ्या चार चेंडूत विरोधी संघाच्या अंतिम फेरीच्या आशेवर फेरले पाणी
‘कोहलीमुळेच भारत टी२० विश्वचषक जिंकू शकत नाही’, पाकिस्तानी दिग्गजाने सोडले टीकास्त्र






