---Advertisement---

“गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला तर…”, सौरव गांगुलीनं स्पष्टचं सांगितलं; अंतिम निर्णय बीसीसीआयचा!

On: शनिवार, जून 1, 2024 6:14 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत माजी सलामीवीर गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 मे पर्यंत होती. सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मार्गदर्शक असलेला गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनणार की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही.

आता यावर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याची प्रतिक्रिया आली आहे. “गंभीर प्रशिक्षक झाल्यास मला आनंद होईल,” असं गांगुली म्हणाला आहे. टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर संपत आहे. ते नोव्हेंबर 2021 पासून ही जबाबदारी सांभाळत आहेत.

सौरव गांगुली म्हणाला, “मी टीम इंडियाचा प्रशिक्षक भारतीय असण्याच्या बाजूनं आहे, कारण आपल्या देशात प्रचंड प्रतिभा आहे. आपल्या देशात खूप कुशल खेळाडू आहेत, ज्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांनी या व्यवस्थेचा एक भाग व्हायला हवं.”

प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेला गंभीर हा यासाठी योग्य व्यक्ती आहे का? असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “त्यानं (गंभीर) अर्ज केला आहे का? कारण आधी त्याला अर्ज करावा लागेल आणि त्यानंतरच त्याला हे पद मिळू शकेल. माझ्या अंदाजानुसार 27 मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. साहजिकच बीसीसीआयला मुदत वाढवण्याचा अधिकार आहे. जर त्यानं (गंभीरनं) अर्ज केला असेल तर तो खूप चांगला उमेदवार आहे.”

गांगुली पुढे म्हणाला की, “गंभीरनं या वर्षी केकेआरसाठी कसं काम केलं ते तुम्ही पाहिलं असेल. तुम्ही त्याची विजयाची भूक आणि जिंकण्याची तळमळ पाहू शकता. त्यानी अर्ज केला आणि बोर्डानं त्याला हे पद देण्याचा निर्णय घेतला तर मला आनंद होईल. मला विश्वास आहे की तो या पदासाठी चांगला उमेदवार आहे.” गौतम गंभीर आयपीएल 2024 पूर्वी केकेआरचा मार्गदर्शक बनला होता. आपल्या पहिल्याच हंगामात त्यानं संघाचा 10 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. विशेष म्हणजे, गंभीरच्या नेतृत्वाखालीच केकेआरनं 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती.

आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि गौतम गंभीर यांच्यात दीर्घ चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी एका अहवालात दावा करण्यात आला होता की, गंभीर आणि बीसीसीआयमध्ये करार झाला असून लवकरच औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका आयपीएल फ्रँचायझी मालकानं सांगितलं की, गंभीरचा करार निश्चित झाला आहे. नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा असेल, जो 1 जुलै 2024 पासून सुरू होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

“असा विचार कधीच केला नव्हता…”, अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या विश्वचषकाबाबत काय बोलला विराट कोहली?

वडिलांच्या निधनानंतर घेतला क्रिकेटमधून ब्रेक! टी20 विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूचा मोठा निर्णय

युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---