-आदित्य गुंड
होय, हे खरं आहे. स्वतः गांगुलीने आपल्या ‘सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकात याबाबतचा किस्सा सांगितला आहे.
सौरवचा तो भारताकडून पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यात त्याने १३१ धावा केल्या होत्या. शतक झळकावून चहापानासाठी सौरव ड्रेसिंग रूममध्ये आला तेव्हा सचिन त्याच्याकडे गेला. सौरवच्या खांद्यावर हात टाकून त्याला म्हणाला, “तू आराम कर. चहा वगैरे घे. बॅटला टेपिंग मी करतो.”
नुसते एवढे सांगून सचिन थांबला नाही तर त्याने खरोखर सौरवच्या बॅटला टेपिंग करून दिले. इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर बरेच तास खेळल्यामुळे सहसा बॅटचे हँडल ढिले होते.
सौरवच्या बाबतीतही हेच झाले होते. काही लोकांना सचिनची ही कृती छोटी वाटू शकते, पण सौरवसाठी ही कृती म्हणजे त्याने केलेल्या खेळीचे कौतुक, आदर आणि संघातल्या बड्या खेळाडूंच्या क्लबमध्ये स्वागत होते.
त्याच्यासाठी सचिनची ही कृती कधीही विसरता न येणारी आठवण तर होतीच त्याबरोबर “इतरांकडून आदर कमवायला वेळ लागतो” हा आयुष्यातला एक मोलाचा धडा देखील होती.
पदार्पणात कसोटीत शतकी खेळी करणारा गांगुली तेव्हा ६२ वा तर एकूण १०४वा खेळाडू आहे. विशेष म्हणजे गांगुलीने हे कसोटी शतक २० जून १९९६ला लाॅर्डवर केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
गंभीरने केला आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेचा अंत्यसंस्कार; वाहिली श्रद्धांजली
रोहित शर्मासाठी हे आहेत सचिनबरोबर घालवलेले सर्वोत्तम ५ क्षण
सचिन-रहाणे पहिल्या भेटीसाठी रहाणेने पाहिली होती ७ तास वाट