आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले रंगते. आगामी विश्वचषकात हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येतील. या सामन्यासाठी जगभरातील चाहते आतुर आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरला होईल. जेव्हाजेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांना आपल्या संघाचा पराभव होऊ नये, अशी इच्छा असते. त्यामुळे दोन्ही संघांवर दडपण असते. वनडे विश्वचषकाचा विचार केल्यास भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध अद्याप एकही सामना हरलेला नाही. उभय संघ विश्वचषकात आत्तापर्यंत सात वेळा आमने-सामने आले असून, प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय संपादन केलेला आहे.
याच मुद्द्यावरून एका मुलाखतीत बोलताना गांगुली म्हणाले,
“भारत पाकिस्तानला विश्वचषकात नेहमीच एकतर्फी पराभूत करत आला आहे. त्यामुळे मला वाटते की, या विश्वचषकात भारत-पाकिस्तान पेक्षा भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना अधिक रोमांचक असेल. भारत-पाकिस्तान सामन्याची केवळ चर्चा होते मात्र आता तो दर्जा राहिला नाही.”
पाकिस्तान संघ भारतात 2016 टी20 विश्वचषकानंतर प्रथमच येत आहे. उभय संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. या सामन्याला अनेकांनी विरोध देखील केला असून, पाकिस्तान सरकार व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संयुक्त सुरक्षा पथक येऊन भारतातील मैदानांची पाहणी करेल. त्यानंतरच पाकिस्तान विश्वचषकात सहभागी होईल.
(Sourav Ganguly Said India v Australia Match Is Bigger Than India Pakistan Match)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा फ्रॉड! आपल्याच खेळाडूंचे 25-25 लाख लाटले, वाचा सविस्तर
वेस्ट इंडीज क्रिकेटला लागली घरघर! 7 वर्षात आयसीसी ट्रॉफीची मुख्य फेरी गाठणेही झाले दुरापस्त