सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. भारताच्या या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होईल. तत्पूर्वी, 5 जुलै रोजी या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, याच मुद्द्यावर भारताचे माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नाराजी व्यक्त केली.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर कसोटी व वन डे मालिकेत भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. मात्र, टी20 मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी हे अनुभवी खेळाडू दिसणार नाहीत. याच मुद्द्यावर एका मुलाखतीत बोलताना गांगुली म्हणाले,
“नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये रोहित व विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आलेले. त्यांचा अनुभव पाहता त्यांना या मालिकेतही खेळण्याची संधी मिळेल असे वाटलेले. मात्र, त्यांची निवड न झाल्याने मी हैराण आहे. ते माझ्या संघात असतेच. मला समजत नाही की त्यांना का विश्रांती दिली.”
रोहित व विराट मागील चार टी20 मालिकांमध्ये भारतीय राहिले नाही. बीसीसीआय भविष्याचा विचार करून हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात संघ तयार करत असल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, आयपीएलमध्ये विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी राहिला होता. यामध्ये त्याच्या दोन शतकांचा समावेश होता. तर रोहितने देखील मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी उपयुक्त योगदान दिलेले. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यातही या दोघांना संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
(Sourav Ganguly Said Why Rest Rohit And Virat In T20 Against West Indies)
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा बर्थडे सेलिब्रेशनचा ‘माही वे’! आपल्या लाडक्या श्वानांसह साजरा केला वाढदिवस, पाहा क्युट व्हिडिओ
विश्वचषकापूर्वी OYO कंपनीने उचलले मोठे पाऊल, 10 शहरांमध्ये वाढवणार तब्बल ‘एवढे’ हॉटेल्स