---Advertisement---

वडिलांच्या निधनामुळे दु:खात असलेल्या सिराजला गांगुलीचा सलाम; केले मोठे वक्तव्य

---Advertisement---

भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शुक्रवारी (२० नोव्हेंबर) धक्कादायक बातमी मिळाली. सिराजचे वडील मोहम्मद घोऊस यांचे हैदराबाद येथे निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. घोऊस यांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता. वडिलांच्या निधनामुळे दु:खी असलेल्या सिराजने त्यांच्या शेवटच्या इच्छेबाबत वक्तव्य केले. त्याचे हे वक्तव्य माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला खूप आवडले. सोबतच गांगुलीने सिराजला सलामही केला आहे.

गांगुलीचा सिराजला सलाम

सिराजच्या वडिलांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना गांगुलीने ट्वीट करत म्हटले, “याचा सामना करण्याचे धाडस सिराजला मिळावे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याच्या यशासाठी माझ्या प्रार्थना आहेत. तो एक उत्तम व्यक्तिमत्व आहे.

सिराज आपल्या वडिलांच्या अंत्य संस्कारासाठीही सामील होऊ शकला नाही. कारण तो सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे क्वारंटाईन आहे. आपल्या वडिलांच्या निधनावर सिराजने म्हटले की, तो आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करेल.

‘वडिलांचे स्वप्न नक्की करेल पूर्ण’

तो म्हणाला, “माझ्या वडिलांचे नेहमीच असे स्वप्न होते की, मी आपल्या देशाचे नाव रोशन करावे आणि मी ते नक्कीच पूर्ण करेल. मी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा पाठिंबा गमावला आहे, हा खूपच दु:खद क्षण आहे. मला देशाकडून खेळताना पाहणे त्यांचे स्वप्न होते. मला आनंद आहे की मी त्यांना समजू शकलो आणि त्यांना खुश करू शकलो.”

सिराजचे वडील एक रिक्षाचालक होते. परंतु असे असूनही त्यांनी आपल्या मुलाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. सिराजने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याचे वडील नेहमीच त्याला क्रिकेटसाठी पाठिंबा देत होते आणि त्याला चांगले बूट घेऊन द्यायचे, जेणेकरून तो चांगली गोलंदाजी करू शकेल.

कारकीर्द

सिराजचे भारतीय संघात स्थान मिळण्यामागे त्याच्या वडिलांचा खूप मोठा हात आहे. सिराजने सन २०१७ मध्ये भारतीय टी२० संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पण केले होते.

त्याने आतापर्यंत १ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने केवळ टी२०त ३ विकेट्स घेतल्या आहेत.

याव्यतिरिक्त आयपीएलबद्दल बोलायचं झालं, तर तो आयपीएल २०२०मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. या हंगामात त्याने ९ सामने खेळताना २१.४५ च्या सरारीने ११ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“होय, गांगुलीचा ‘तो’ झेल शंकास्पद होता”, इंजमामची २१ वर्षांनंतर कबुली

टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

“आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार होऊ शकत नाही, विराटला त्याच्या पदावर राहू द्या”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---