---Advertisement---

दादा यावेळी थेटच म्हणाले, “भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे….”

On: रविवार, जुलै 14, 2024 10:22 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली केलेल्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. खरंतर, दादांनी अचानक विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे कमान सोपवण्याच्या निर्णयाची आठवण करून दिली आहे. गांगुलीने त्याच्याच शैलीत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. दादा काय म्हणाले ते कळू द्या.

टी20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्माला भारतीय टी20 टीमचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्यानंतर रोहितकडे वनडे आणि कसोटी संघाचीही कमान सोपवण्यात आली. आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आणि दादांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, “जेव्हा मी भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले, तेव्हा सर्वांनी माझ्यावर टीका केली. आता भारताने टी-20 विश्वचषक जिंकला आहे, यासाठी सर्वांनी मला शिव्या देणे बंद केले आहे.” मला वाटतं की मीच रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नेमलं होतं हे सर्वजण विसरले आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत सर्व सामने जिंकले. मात्र टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

तर टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या स्पर्धेतही टीम इंडियाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. भारताचा एक सामना पावसामुळे गमवावा लागला.एकवेळ अशी होती की, अंतिम फेरीत भारत पुन्हा एकदा विजेतेपदापासून दूर राहणार असे वाटत होते, मात्र रोहित शर्माने शेवटच्या पाच षटकांत अनेक शानदार निर्णय घेत आपल्या हुशार कर्णधारपदाच्या जोरावर भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले.

महत्तवाच्या बातम्या-

ठरलं! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज दिसणार नव्या टीममध्ये, यासंघांसोबत रिकी पाँटिंगची लागणार वर्णी?
IND VS ZIM, टीम इंडियाच्या विजयानंतर गिल ठरला खलनायक, चाहत्यांनी केला हा थेट आरोप
WCL 2024, भारताचा पाकिस्तानला दणका, टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफीवर कब्जा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---