गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकापासून टीम इंडियामध्ये कर्णधार बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसे, विराट कोहलीनंतर रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पण एका वर्षात टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये ८ वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
सौरव गांगुली म्हणाला की, “खेळाडूला दुखापत झाल्यावर आपण काहीच करू शकत नाही. रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. तुम्ही जास्त खेळल्यास, दुखापत होण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीत तुम्हाला खेळाडूंसाठी दुखापतीचे ब्रेकही ठेवावे लागतील.” विशेष म्हणजे यावेळी सौरव गांगुली याने भारतीय संघात स्थान मिळत असणाऱ्या युवा खेळाडूंकडेही सर्वांचे लक्ष्य वेधले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
ENGvsSA: लॉर्ड्स कसोटीआधीच इंग्लंड संघाचा ‘तो’ फोटो होतोयं भलताच व्हायरल
पाकिस्तानी संघाचं टेन्शन वाढलं! दुखापतग्रस्त शाहीन आफ्रिदी सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार