भारताय संघाचा एशिया कप स्पर्धेचा कर्णधार रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून वगळ्यात आले आहे. रोहितने या स्पर्धेत दमदार फलंदाजी करताना 327 धावा केल्या आहेत.
त्यावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली नाराज झाला आहे.”रोहित संघात निवडला गेला नसल्याचे कळल्यावर आपल्याला आश्चर्य वाटले”, असे गांगुलीने पुढे म्हटले आहे
Great win Rohit and the team @ImRo45 ..u were exceptional…I get surprised every time I don’t see ur name in the test team ..it’s not far away ..
— Sourav Ganguly (@SGanguly99) September 29, 2018
15 सदस्यीय संघात मयांक अग्रवाल या नवोदित चेहऱ्याला संधी मिळाली आहे. तर शिखर धवनलाही या संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लडविरूद्धच्या कसोटीत त्याला धावा करण्यात अपयश आले होते. त्याने इंग्लडमध्ये 8 डावात फक्त 162 धावा केल्या होत्या.
एशिया कप स्पर्धेत विश्रांतीदेण्यात आलेल्या विराट कोहलीने संघात अपेक्षेप्रमाणे पुनरागमन केले आहे. भारताकडे सध्या पृथ्वी शॉ, मंयाक अग्रवाल, आणि केएल राहुल यांचा सलामीला पर्याय आहे.
मोहम्मद सिराज या अजून एका नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. त्याने भारत अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती.
पहिला कसोटी सामना 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान राजकोट येथे होणार आहे, त्यानंतर 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरदरम्यान दुसरा कसोटी सामना होणार आहे.
त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून वन-डे मालिकेला सुरूवात होणार आहे.
वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शाॅ, मयांत अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
महत्वाच्या बातम्या-
-विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंचा संघात समावेश
–..म्हणून केदार जाधवला मिळू शकते विश्वचषक 2019 मध्ये खेळण्याची संधी
–अशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी