fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंचा संघात समावेश

मुंबई | भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन आणि मुरली विजय यांना संघातून डच्चू देताना मयांक अग्रवालला देशांतर्गत कामगिरीच्या जोरावर संघात स्थान देण्यात आले आहे.

हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असल्याचे तर पंड्या आणि इशांत दुखापतीमधून न सावरल्यामुळे संघात दिसणार नाही.

४ आॅक्टोबरपासून ह्या मालिकेला राजकोट कसोटीने सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी विराटचा दुखापतीमुळे संघात समावेश होतो की नाही याबद्दल मोठी चर्चा होती. परंतु तो या मालिकेसाठी त्याचे नाव संघात घेण्यात आले आहे.

मयांक अग्रवालला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरीचे फळ म्हणुन संघात स्थान देण्यात आले आहे. तर इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान देण्यात आलेला परंतु एकही कसोटी सामना खेळायला न मिळालेला पृथ्वी शाॅ या संघाचा भाग असणार आहे.

संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेवर विश्वास कायम ठेवत त्याला उपकर्णधारपदावर कायम ठेवले आहे.

अशी आहे विंडीज विरुद्ध टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शाॅ, मयांत अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

महत्वाच्या बातम्या-

विंडिज विरुद्ध कोहलीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; काय आहे कारण जाणून घ्या

भारत-बांगलादेश अंतिम सामन्याची तिकिटे नाराज पाकिस्तानी चाहत्यांनी विकली

कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो

You might also like