मुंबई । सिकंदराच्या आविर्भावात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला सौरव गांगुलीच्या भारतीय संघाने 2000 साली पाणी पाजले. ऑस्ट्रेलियाचा सलग 16 कसोटी जिंकण्याचा विजयी रथ भारतीय संघाने रोखला. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मिळवलेले हे सर्वात मोठे आणि उल्लेखनीय यश मानले जाते. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने सौरव गांगुलीचा कसोटी संघ विराट कोहलीच्या कसोटी संघापेक्षा मजबूत असल्याचे सांगितले.
आकाश चोप्रा स्पोर्ट्स क्रीडाशी विराट कोहलीच्या बाबतीत बोलताना म्हणाला, ‘2018-19 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने परदेशी परिस्थितीमध्ये आपली छाप सोडण्याचा खूप प्रयत्न केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड येथे पराभवाचा सामना करावा लागला.’
तसेच गांगुलीच्या नेतृत्वाबद्दल आकाश म्हणाला, विदेशात कसे जिंकायचे हे सौरव गांगुलीने भारतीय संघाला शिकवले. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकली होती.
“आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होता आणि कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवले तर पाकिस्तानच्या दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवला. भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आम्ही अनिर्णित राखली तर एका कसोटी मालिकेत पराभव झाला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळली गेलेली इंग्लंडमधील कसोटी मालिका अनिर्णित झाली. तो खरोखरच दर्जेदार संघ होता, ज्याने आम्हाला परदेशात जिंकण्यास शिकवले.”
“त्याच वेळी विराटच्या संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात पराभूत केले होते आणि भारतीय क्रिकेट इतिहासात असे करणारा पहिला संघ बनला होता. पण त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेमध्ये भारत पराभूत झाला होता आणि इंग्लंडमध्येही त्यांचा वाईट पराभव झाला होता.” असे आकाश चोप्राने सांगितले.
आकडेवारीचा विचार केला तर विराट कोहली भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. मागील वर्षी त्याने जमैका कसोटीत वेस्ट इंडीजला हरवून एमएस धोनीचा विक्रम पाठीमागे टाकला. त्याच्याच नेतृत्वाखाली भारत आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 0- 2फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर भारताचे कसोटी चॅम्पियनशीपमध्ये 360 गुण झाले आहेत.
तसेच आकाश चोप्राने सौरव गांगुलीचा कसोटी संघ आणि विराट कोहलीचा कसोटी संघ निवडला आहे. तो संघ पुढील प्रमाणे
सौरव गांगुली कसोटी संघ-
वीरेंद्र सहवाग, आकाश चोप्रा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, पार्थिव पटेल, हरभजन सिंग, अनिल कुंबले, झहीर खान, अजित अगरकर
विराट कोहली कसोटी संघ-
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हमुमा विहारी, वृद्धिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी/जसप्रीत बुमराह
ट्रेंडिंग घडामोडी –
इरफान पठाणला व्हायचंय दहशतवादी हफिज सईद, पहा कोण म्हणतंय हे
७व्या वर्षी घेतली धोनीकडून प्रेरणा, आज आहे दिग्गज क्रिकेटर व विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या अध्यक्ष
आयपीएल २०२१ मध्ये ‘या’ संघासाठी खेळण्यास श्रीसंत उत्सुक