---Advertisement---

टीम इंडियाचे अभिनंदन करणारे बीसीसीआय अध्यक्ष गांगुलींचे ट्वीट होतयं व्हायरल, काय असेल कारण?

Sourav-Ganguly
---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात मर्यादीत षटकाच्या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताने ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅनचेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. यामुळे भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ने जिंकली आहे. इंग्लंड संघाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केल्याने भारतीय संघावर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यातच बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अध्यक्ष सौरव गांगुली यांचे अभिनंदनाचे ट्वीट व्हायरल झाले आहे.

सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा उल्लेख केल्याने लोकांचे लक्ष वेधले जात आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, “इंग्लंडमध्ये धमाकेदार प्रदर्शन, त्यांच्या देशात विजय मिळवणे सोपे नाही. कसोटीत २-२, टी२० आणि वनडेमध्ये विजय. खूपच चांगले राहुल द्रविड, रोहित शर्मा, रवी शास्त्री, विराट कोहली. पंत आणि पंड्याची विशेष कामगिरी.”

भारताने चौथ्यांदा इंग्लंडमध्ये द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली आहे. तसेच २०१४नंतर प्रथमच भारताने मर्यादित षटाकांची मालिका जिंकली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. याला योग्य ठरवत गोलंदाजांनी तशी कामगिरीही केली आहे. जसप्रीत बुमराह याच्या जागी खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्याच षटकात जॉनी बेयरस्टो आणि जो रुट यांना शून्य धावांवर बाद करत इंग्लंड संघाला लागोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर हार्दिक पंड्याने मोर्चा सांभाळत ७ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. ही त्याची वनडेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. युझवेंद्र चहलने ३ विकेट्स आणि रवींद्र जडेजाने १ विकेट घेत इंंग्लंडला ४५.५ षटकात २५९ धावांवर रोखले.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या पहिल्या चार विकेट्स ७२ धावांतच पडल्या. अशा बिकट परिस्थितीत संघ असताना पंत आणि हार्दिक यांनी पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. पंतने नाबाद १२५ आणि हार्दिकने ७१ धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मावळकन्या हर्षदाचे जागतिक स्पर्धेत ‘सुवर्णयश’

VIDEO | रिषभ पंतला मिळालेल्या बक्षिसावर ड्रेसिंग रूममध्ये जाण्याआधीच रवी शास्त्रींनी मारला डल्ला

दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या कॅरेबियन दिग्गजाचा क्रिकेटला रामराम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---