---Advertisement---

‘हमे तो अपनोने लूटा’! गांगुलींना पुन्हा व्हायचे होते बीसीसीआय अध्यक्ष? मात्र…

On: बुधवार, ऑक्टोबर 12, 2022 2:12 PM
Sourav-Ganguly
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला‌(बीसीसीआय) नवे अध्यक्ष लाभणे जवळपास निश्चित झाले आहे. भारताचे माजी विश्वचषक विजेते अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी ‌‌बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला असून, त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता नाही. या सर्व घडामोडीत सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून अखेरचे काही तास शिल्लक असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली हे नाराज असल्याचे समजतेय.‌ गांगुली यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद हवे होते. मात्र, पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी या निवडणुकीसाठी नकार दर्शविला आहे.

न्यायालयाच्या नव्या नियमानुसार कोणतीही व्यक्ती दोन कार्यकाळात बीसीसीआयचे पद भूषवू शकते. याचाच फायदा घेत विद्यमान सचिव जय शहा हे आपल्या पदावर कायम राहणार आहेत. परंतु, गांगुली यांना पुरेसा पाठिंबा नसल्याने ते या पदावरून पायउतार होतील. त्यांच्या जागी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती केली जाईल. 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सभेत याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गांगुली यांना आणखी एक टर्म बीसीसीआय अध्यक्षपद हवे होते. मात्र, इतरांचा त्यांना पाठिंबा नव्हता. तसेच या बदल्यात त्यांना आयपीएल चेअरमन पदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, ज्या संस्थेचे सर्वोच्च पद भूषवले आहे, त्या संस्थेच्या दुय्यम समितीत काम करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच जागतिक क्रिकेट परिषदेतही भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावाचा विचार केला गेला नाही. तीन वर्षे बीसीसीआय अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले गांगुली पुन्हा एकदा कोचिंगकडे वळण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससाठी मेंटर म्हणून काम पाहिलेले.

‌‌महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंड्याला टक्कर द्यायला आला ‘हा’ ऑलराऊंडर! टी20 सामन्यात तुफानी फिफ्टी आणि घेतल्या 6 विकेट्स
ते पुन्हा आलेत! मालिका जिंकताच गब्बर सेनेचा ‘बोलो तारारारा’; पाहा भारी व्हिडिओ  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---