---Advertisement---

तेव्हा धोनी गांगुलीला म्हणाला होता, दादा तुम्हीच कर्णधारपद सांभाळा!

On: शुक्रवार, जुलै 27, 2018 7:02 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांची नावे नेहमीच महान कर्णधारांमध्ये घेतली जातात.

धोनीने त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दही गांगुलीच्या नेतृत्वाखाली सुरु केली होती. तर गांगुलीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला.

या प्रवासाबद्दल काही आठवणी गांगुलीने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये सांगितल्या आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेदरम्यान अर्ध्यातच अनिल कुंबळेने कर्णधारपद सोडल्याने भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा धोनीने हाती घेतली होती. ही मालिका गांगुलीची अखेरची मालिका होती.

या मालिकेतील शेवटचा सामना नागपूरला झाला. या सामन्यात पाचव्या दिवशी शेवटची काही षटके धोनीने गांगुलीला नेतृत्व करण्यास सांगितले होते.

याबद्दल गांगुलीने सांगितले, “जेव्हा मला धोनीने नेतृत्व करण्यास सांगितले तेव्हा मी आश्चर्यचकीत झालो होतो. मी त्याला सांगितले की तूच कर पण त्याने मला आग्रह केला की आपण तो सामना जिंकण्याच्या स्थितीत आहोत आणि दोन षटकांचाच प्रश्न आहे.”

“त्यानंतर मी क्रिकेट थांबवणार होतो. तो माझ्या शेवटच्या कसोटीचा पाचवा दिवस होता. तो शेवट होता. पण तरीही त्याने मला सांगितले की नेतृत्व कर. त्यानंतर मी दोन षटके नेतृत्व केले आणि नंतर पून्हा ती जबाबदारी धोनीकडे सोपवली.”

याबरोबरच गांगुलीने धोनीच्या कारकिर्दीबद्दल कौतुक करताना सांगितले की, “मी जेव्हाही धोनीला पहातो तेव्हा मला आनंद होतो. जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा भारतातील पूर्व भागातून खूप कमी क्रिकेटपटू पुढे आले होते. लोकांना वाटायचे की या भागातून चांगले क्रिकेटपटू तयार होऊ शकत नाही. पण आम्ही दोघांनीही भारताचे बराच काळ नेतृत्व केले आणि खुप सामनेही खेळलो.”

“जेव्हा टी20 नव्हते तेव्हा मी जवळजवळ 450 सामने खेळलो, तर कार्डीफमध्ये धोनीने त्याचा 500 वा सामना खेळला. भारतातील ज्या भागात जास्त खेळाडू तयार होत नाही अशा भागातून आल्याने आनंद होतो. अशा भागातून सौरव गांगुली आणि एमएस धोनी सारखे कर्णधार भारताला मिळाले.”

तसेच धोनीच्या नेतृत्वाबद्दल गांगुली म्हणाला सुरुवातीला मी त्याच्यामध्ये नेतृत्वगुण पाहिले नव्हते. हे सर्व वेळेनुसार घडते. पण मला खात्री होती, त्याच्यात खूप ताकद होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?

-त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’

-टीम इंडियासाठी खुशखबर! दोन महत्त्वाचे गोलंदाज सराव सामन्यात चमकले

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment