इंग्लंडमध्ये सध्या काउंटी चँपियनशीपचा थरार सुरू आहे. जगभरातील बलाढ्य संघांचे प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू या स्पर्धेत आपला दम दाखवताना दिसत आहेत. ४ जुलै ते ७ जुलै या कालावधीत साउथम्पटन येथे काउंटी चँपियनशीपच्या दुसऱ्या गटातील हँपशायर विरुद्ध सर्रे सामना झाला. हँपशायरने ४८८ धावांचे भलेमोठे आव्हान दिल्यानंतर सर्रे संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता. मात्र ३८ वर्षीय हाशिम अमला याने अनपेक्षित खेळी साकारत सामना अनिर्णीय राखला. त्याच्या या खेळीला अनेकांनी सलाम केला आहे.
कॉलिन डी ग्रँडहोमची नाबाद १७४ धावांची खेळी आणि आयन हॉलंड व फेलिक्स ऑर्गनच्या अर्धशतकांच्या बळावर हँपशायरने प्रथम फलंदाजी करताना ४८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पहिल्या डावात सर्रे संघ केवळ ७२ धावांवर गारद झाला. केथ बार्कर आणि कायल अबॉटच्या भेडक माऱ्यापुढे कोणताही फलंदाज ३० धावांचाही आकडा गाठू शकला नाही. त्यामुळे सर्रे संघावर फॉलोऑन खेळण्याची वेळ आली.
फॉलोओन खेळतानाही सर्रे संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मात्र एका बाजूने विकेट्स जात असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज अमलाने चिवट झुंज दिली. सामन्याखेर तब्बल २७८ चेंडूंमध्ये १३.३० च्या स्ट्राईक रेटने त्याने नाबाद ३७ धावांची खेळी केली. या अतिशय धिम्या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार मारले. त्याच्या हळूवार खेळीमुळे सर्रे संघ पाचव्या दिवसाखेर ८ बाद १२२ धावा करु शकला आणि सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.
भलेही अमलाने हळूवार फलंदाजी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा नकोसा विक्रम केला. परंतु यामुळे त्याचा संघ पराभूत होण्यापासून वाचला आणि त्यांनी गुणतालिकेत त्यांच्या गटात तिसऱ्या स्थानावर ताबा मिळवला. तर प्रतिस्पर्धी हँपशायर संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
Most balls faced in a first-class innings of less than 40:
278 HM Amla (37*) Surrey v Hampshire Southampton 2021
277 TE Bailey (38) England v Australia Leeds 1953
(where balls faced are known)— Andrew Samson (@AWSStats) July 7, 2021
तसे तर, अमलाने हळूवार फलंदाजी करण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापुर्वी २०१५ मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात त्याने २४४ चेंडूत फक्त २५ धावा केल्या होत्या. यावेळी विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने दुसऱ्या बाजूने त्याला पुरेपुर साथ दिली होती. तेव्हा डिविलियर्सने २९७ चेंडूंमध्ये ४३ धावा करत दक्षिण आफ्रिकेला पराभवापासून वाचवले होते.
२००८ पासून प्रथम श्रेणी डावात सर्वात कमी स्ट्राईक रेट (किमान २०० चेंडूत)
१०.२४ – हाशिम आमला विरुद्ध भारत, २०१५ (२४४ चेंडूत २५ धावा)
१३.३० – हाशिम अमला विरुद्ध हॅम्पशायर, २०२१ (२७८ चेंडूत ३७* धावा)
१७.४७ – एबी डिव्हिलियर्स विरुद्ध भारत, २०१५ (२९७ चेंडूत ४३ धावा)
१५.०० – एबी डिव्हिलियर्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१२ (२२० चेंडूत ३३ धावा)
महत्त्वाच्या बातम्या-
टीममधून बाहेर काढले आहे, आता बॅटसुद्धा घ्या आणि मी जातो हात हलवत
रांची फार्महाऊसमध्ये मित्र परिवासासंगे माहीने ‘असा’ साजरा केला ४०वा वाढदिवस, फोटो तुफान व्हायरल