भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये येत्या काही दिवसात मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. वरिष्ठ संघातील खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे बीसीसीआयने युवा खेळाडूंना या मालिकेत खेळण्याची संधी दिली आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी तुफान फटकेबाजी केल्याचे दिसून आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दुसऱ्या इंट्रास्क्वाड सराव सामन्यातील फोटो शेअर केले आहेत. या सराव सामन्यात संघातील खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. शिखर धवन, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्या या खेळाडूंनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केल्याचे दिसून आले आहे.
या फोटोवरील कॅप्शनमध्ये बीसीसीआयने, “मैदानावर आणखी एक चांगला दिवस गेला,” असे लिहिले आहे. हा सराव सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. (Bcci shares photos of second intra squad match)
बीसीसीआयने यावेळी ६ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अनेक युवा खेळाडू दिसून येत आहेत, ज्यामध्ये चेतन सकारिया, इशान पोरेल, इशान किशन, कुलदीप यादव आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये कर्णधार शिखर धवन क्षेत्ररक्षण करताना दिसून येत आहे. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या फोटोमध्ये मनीष पांडे आणि हार्दिक पंड्या शॉट खेळताना दिसून येत आहेत. तसेच शेवटच्या दोन फोटोमध्ये ऋतुराज गायकवाड कव्हर ड्राईव्ह आणि पृथ्वी शॉ स्वीप शॉट खेळताना दिसून येत आहेत.
— BCCI (@BCCI) July 7, 2021
पहिल्या इंट्रास्क्वाड सामन्यात, शिखर धवन इलेव्हेन आणि भुवनेश्वर कुमार इलेव्हेन या दोन्ही संघांमध्ये सामना रंगला होता. या सामन्यात शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या संघाने १५० धावा केल्या होत्या. यामध्ये मनीष पांडेने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली होती. तर ऋतुराज गायकवाडने ३० धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भुवनेश्वर कुमारच्या संघाने १७ व्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यामधे सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली होती. तर पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडीक्कलने ६० धावांची भागीदारी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
‘दुसऱ्या दर्जाचा संघ नाही, तर धवनसेनेत बलाढ्य संघांनाही धोबीपछाड देण्याची ताकद’
गांगुलीने नुसती दादागिरीच नाही केली तर ‘हे ५ कोहिनूर हिरे’ दिले टीम इंडियाला