---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेने घडवला इतिहास! टी20 मध्ये पार केले 259 धावांचे आव्हान, डी कॉकचे वादळी शतक

On: रविवार, मार्च 26, 2023 9:31 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (26 मार्च) सेंचुरियन येथे खेळला गेला. ऐतिहासिक अशा स्वरूपाच्या झालेल्या या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी मिळालेले 259 धावांचे आव्हान 7 चेंडू व 6 गडी राखून पार केले. ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटचा इतिहासात पार केली गेलेली सर्वात मोठी धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉक याने तुफानी शतक झळकावले.

https://twitter.com/ICC/status/1640015076940759040?t=CN4J9Igaf0fRXSixWNciyg&s=19

सेंच्युरियन येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या चेंडूवर किंग बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यानंतर चार्ल्स व कायले मेयर्स ही जोडी यजमान गोलंदाजांवर तुटून पडली. दोघांनी षटकार चौकारांची आतिषबाजी करत केवळ 58 चेंडूवर 135 धावांची भागीदारी केली. मेयर्सने 27 चेंडूंवर 51 धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूने चार्ल्स थांबायचे नाव घेत नव्हता. कर्णधार पॉवेलच्या 19 चेंडूतील 28 व शेफर्डच्या 18 चेंडूतील 41 धावांमूळे वेस्ट इंडीज संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने गेला. चार्ल्सने केवळ 39 चेंडूवर शतक गाठले. बाद होण्यापूर्वी 46 चेंडूवर 10 चौकार व 11 षटकारांच्या मदतीने त्याने 118 धावा केल्या.

टी20 इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला देखील स्वप्नवत सुरुवात मिळाली. क्विंटन डी कॉक व रिझा हेंन्ड्रिक्स यांनी पहिल्या सहा षटकातच 102 धावा कुटल्या. डी कॉकने 43 चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. रिझाने 28 चेंडूवर 68 धावांचे योगदान दिले. दोघांनी 10.5 षटकात 151 धावांची सलामी दिली. त्यानंतर इतर फलंदाजांनी फारशी जोखीम न घेता 6 गडी राखून संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

(South Africa Beat West Indies In Centurion T20I By 6 Wickets South Africa Successfully Chase 259 Runs De Kock Hits Century)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायलेकाचं प्रेम! सचिनने आईसोबतचा खास व्हिडिओ केला शेअर, 3 तासात मिळालेत 2 लाख हिट्स
WPL Final : टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, ट्रॉफीसाठी दोन्ही संघाच्या रणरागिणी देणार कडवी झुंज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---