---Advertisement---

“निवृत्तीनंतरही एबी डिविलियर्स पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, पण…” प्रशिक्षकाने दिले संकेत

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 3:11 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो जगभरातील व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसतो. तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी याबाबत मोठे संकेत दिले आहे.

डिव्हिलियर्सशी आमची चर्चा झाली
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या मार्क बाऊचर यांनी डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी बोलताना मोठी गोष्ट म्हटली. बाऊचर म्हणाले, “डिव्हिलियर्स आयपीएलसाठी भारताकडे रवाना होण्यापूर्वी माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एबी स्वत: आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. तो स्वतःला सिद्ध करू इच्छितो. तो क्रिकेटचा दिग्गज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या पुनरागमनाबाबत आयपीएलनंतर निर्णय घेतला जाईल.”

विश्वचषकातून करणार होता पुनरागमन
डिव्हिलियर्स २०२० टी२० विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र, कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे विश्वचषक पुढे ढकलण्यात आला आहे. विश्वचषक आता यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतात खेळवला जाईल.

आयपीएलमध्ये दमदार सुरूवात
आयपीएल २०२१ ची सुरुवात डिव्हिलियर्सने दमदार अंदाजात केली. हंगामातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध संघ अडचणीत असताना त्याने ४८ धावांची खेळी केली होती. तसेच तो संघासाठी पूर्ण वेळ यष्टीरक्षकाचे भूमिका निभावणार आहे. आरसीबीमध्ये यावेळी विराट कोहली, एबी डिव्हिलर्सच्या सोबतीला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलदेखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितची थट्टा करणे अँकर मयंतीला पडले महागात, चाहत्यांनी घेतली शाळा; वाचा पूर्ण प्रकरण

Video: तयारी जोमात! पहिल्याच काउंटी सामन्यात विहारीने टिपला एकहाती भन्नाट झेल; इंग्लिश खेळाडूही पाहून दंग

प्रेयसी नव्हे तर ‘हे’ माझं पहिलं प्रेम; ईशान किशनच्या खुलास्यावर गर्लफ्रेंड आदिती म्हणते…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---