दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेने २०१९- २० या वर्षासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि लॉरा वोल्वार्ड्ट (Laura Wolvaardt) यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला ‘क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार’ मिळाला. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे पारंपारिक पुरस्कार सोहळा शक्य झाला नाही.
डी कॉक आणि वोल्वार्ड्ट दोघेही सीएसए पुरस्कारा दरम्यान चमकले. कारण, त्यांना तीन वेगवेगळ्या प्रकारात नामांकित करण्यात आले होते. डी कॉकला वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटर’ म्हणून देखील सन्मानित करण्यात आले.
दुसरीकडे, वोल्वार्डट्ला ‘महिला क्रिकेटर ऑफ द इयर’ सोबतच सर्वोत्कृष्ट महिला वनडे खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
डी कॉकची यापूर्वी २०१७ मध्ये ‘पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. त्याला हा पुरस्कार दुसऱ्यांना मिळाल्याने तो दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला आहे. त्याच्या आधी सीएसएचा हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार जॅक कॅलिस (२००४ & २०११), मखाया एनटीनी (२००५ आणि २००६), हाशिम आमला (२०१० आणि २०१३), एबी डिविलियर्स (२०१४ आणि २०१५) आणि कागिसो रबाडा (२०१६ आणि २०१८) यांना प्रत्येकी दोन वेळा मिळाला आहे.
२१ वर्षीय वोल्वार्डट् महिला विभागात हा पुरस्कार जिंकणारी सर्वात युवा खेळाडू ठरली. इतर पुरस्कारांत लुंगी एनगीडी (Lungi Ngidi) याला ‘पुरुष वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ आणि ‘पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर’ हे दोन पुरस्कार मिळाले. तसेच अॅनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) याला वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू आणि ‘डिलिव्हरी ऑफ द इयर’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. डेव्हिड वॉर्नरला सेनवेस पार्क येथे तिसऱ्या वनडे सामन्यात बाद केल्याबद्दल पुरस्कार हा पुरस्कार दिला गेला. सर्वोत्कृष्ट महिला टी२० खेळाडूचा पुरस्कार शबनीम इस्माईल हिला मिळाला.
सीएसएचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी, जॅक फॉल यांनी पुरस्कार जिंकलेल्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…
-किंग कोहली सोडणार टीम इंंडियाचे कर्णधारपद?