---Advertisement---

‘स्टेनगन’ अखेर थंडावली! दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 4:10 PM
Dale-Steyn
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा ३८ वर्षीय वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने मंगळवारी (३१ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘स्टेनगन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाने २ वर्षांपूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. पण आता त्याने उर्वरित वनडे आणि टी२० स्वरुपातूनही निवृत्ती जाहीर केली आहे.

आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर आपल्या कारकिर्दीतील काही फोटो शेअर करत निवृत्तीची माहिती दिली आहे. सोबतच त्याने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. त्याचा संघ सहकारी आणि दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स याने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्टेनने २०१९ मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर वनडे आणि टी२० स्वरुपात त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मार्च २०१९ मध्ये श्रीलंकाविरुद्ध त्याने शेवटचा वनडे सामना खेळला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा फेब्रुवारी २०२० मधील टी२० सामना त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या स्टेनने दक्षिण आफ्रिकेकडून एकूण ९३ कसोटी सामने, १२५ वनडे सामने आणि ४७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २२.९५ च्या सरासरीने ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २५.९५ च्या सरासरीने १९६ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने १८.३५ च्या सरासरीने ६४ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने आपल्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत बरेचसे विक्रम केले आहेत. त्यातील एक असा विक्रम आहे, जो आजवर कोणालाही जमलेला नाही. स्टेन जगातील एकमेव असा वेगवान गोलंदाज आहे, ज्याने ९ कसोटी खेळणाऱ्या प्रमुख संघांविरुद्ध एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच २०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत त्याचा स्टाईक रेट सर्वात्तम म्हणजेच ४२.३ इतका आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लीड्स ते लंडन, भारतीय क्रिकेटर्स लक्झरी ट्रेनने पोहोचले ओव्हलला; पाहा प्रवासातील भारी फोटो

‘तो इथेच चुकतोय’; मोठ्या खेळीसाठी झगडत असलेल्या कोहलीची माजी कसोटीपटूने दाखवून दिली चूक

शाहिद आफ्रिदीला आला तालीबान्यांचा पुळका; केले असे वक्तव्य की, नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---