विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झालेल्या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला आहे. या सामन्यात भारताची फलंदाजी सुरु असताना एक गमतीशीर घटना घडली आहे.
झाले असे की दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात 129 व्या षटकात केशव महाराज गोलंदाजी करत असताना 5 व्या चेंडूवर भारताकडून रविंद्र जडेजाने ऑफसाइड ऑफला चौकार मारला. पण हा चौकार गेलेला चेंडू बाउंड्री लाइनच्या प्रिस्मिक वेजेसमध्ये (बाउंड्री रोपमध्ये) अडकला.
पण हे सुरुवातीला क्षेत्ररक्षकांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षक वर्नोन फिलँडर, दक्षिण आफ्रिकेचे राखीव खेळाडू आणि अन्य ग्राउंड स्टाफमधील सदस्य बाउंड्री जवळ असणाऱ्या कव्हर्समध्ये आणि आजूबाजूला चेंडू शोधत होते.
याचवेळी कॅमेरामनने अडकलेला चेंडू बरोबर टिपला आणि त्याने चेंडू जवळ झूम केले. हे दृश्य मैदानातील स्क्रिनवर दाखवण्यात आले. त्यामुळे क्षेत्ररक्षकांना चेंडूचे ठिकाण लक्षात आले. अखेर एडेन मार्करमने तिथे येऊन बाउंड्री लाईनजवळ अडकलेला चेंडू काढला. चेंडू मिळाल्यानंतर मार्करमलाही हसू आवरता आले नाही. तसेच ही घटना पाहून समालोचकांनीही हसून मजा घेतली.
https://twitter.com/OOCCricket_/status/1179703080994185217
या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्माने 244 चेंडूत 176 धावांची तर मयंक अगरवालने 371 चेंडूत 215 धावांची द्विशतकी खेळी केली आहे.
तसेच दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 20 षटकात 3 बाद 39 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून डिन एल्गार 27 धावांवर तर तेंबा बाऊमा 2 धावांवर नाबाद आहेत. भारताकडून आर अश्विनने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित शर्मा-मयंक अगरवालने ३१७ धावांची भागीदारीच नाही तर हा खास विक्रमही केलाय
–‘द्विशतकवीर’ मयंक अगरवालने मिळवले त्या ४ भारतीयांमध्ये मानाचे स्थान
–या देशाकडे आहेत सर्वाधिक कसोटी शतकवीर; भारत आहे या क्रमांकावर