IND vs SA 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा वनडे सामना केबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याची नाणेफेक दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय मिळवून यजमान संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघात महत्त्वाचे दोन बदल झाले आहेत. ब्यूरन आणि लिझाद विलियम्स संघात परतले आहेत. या सामन्यात भारतीय संघातही मोठा बदल आहे. श्रेयस अय्यर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाहीये. तसेच, भारताकडून विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने वनडे पदार्पण केले. आहे.
South Africa have won the toss and they've decided to bowl first. pic.twitter.com/Q7TMQWO93g
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 19, 2023
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका संघ-
टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), डेविड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विलियम्स, ब्यूरन हेंड्रिक्स
भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार (South Africa have won the toss and have opted to field against India INDvsSA 2nd ODI)
हेही वाचा-
90 मिनिटात घडला आयपीएल इतिहास! स्टार्कसाठी केकेआरची सर्वात मोठी बोली, कमिन्सलाही टाकलं मागे
IPL 2024 Auction: चेन्नईने दाखवला न्यूझीलंडच्या फलंदाजावर विश्वास, एकट्यावर केले तब्बल ‘एवढे’ कोटी खर्च