---Advertisement---

षटकारांचा पाऊस पाडत दक्षिण आफ्रिकेने भारतभूमीवर रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला पहिला संघ

On: मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022 11:03 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना इंदोर येथे खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात शानदार खेळ दाखवत 49 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजांनी तुफानी खेळ दाखवत 227 धावा उभारल्या होत्या. रायली रुसो, क्विंटन डी कॉक व डेव्हिड मिलर यांनी भारताविरुद्ध अशी काही फलंदाजी केली की, भारतावर टी20 इतिहासात प्रथमच एका खराब कामगिरीची नामुष्की ओढवली.

प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा हा केवळ तीन धावा करत बाद झाला. मात्र, क्विंटन डी कॉकने 43 चेंडूवर 68 धावांची खेळी केली. यामध्ये 6 चौकार व 4 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे पहिल्या दोन सामन्यात खातेही न खोलू शकलेल्या रायली रुसोने त्यापेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी केली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 48 चेंडूवर नाबाद 100 धावा केल्या. यात 7 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याने देखील रूसोला सुयोग्य साथ देत एक षटकार व एका चौकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. अखेरच्या षटकात फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने तीन षटकारांच्या मदतीने 5 चेंडूवर 19 धावांचा तडाखा दिला.

दक्षिण आफ्रिकेने आपल्या डावात 16 षटकार ठोकले. भारताविरुद्ध भारतात प्रथमच कोणत्याही संघाने अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये वेस्ट इंडीजने हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात 15 षटकार खेचलेले. हा विक्रम दक्षिण आफ्रिकेने आता मोडीत काढला आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 च्या एका डावामध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम भारत व वेस्ट इंडीज या संघाच्या नावे आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 21 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध याच इंदोरच्या ही कामगिरी केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

जा माफ केलं! संधी असतानाही चाहरने दाखवला मनाचा मोठेपणा, आफ्रिकन फलंदाजाला दिले जीवदान
रोहित शर्माचा शर्मनाक रेकॉर्ड, भल्याभल्यांना मागे टाकत ‘या’ लाजीरवाण्या यादीत भाऊ पहिल्या स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---