वनडे विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी (24 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ आमने-सामने आले. मुंबईचा वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 382 धावा उभारल्या. क्विंटन डी कॉक याने झळकावलेल्या 174 धावा व हेन्रिक क्लासेन याच्या तुफानी 90 धावांच्या जोरावर त्यांनी हे आव्हान ठेवले. मात्र या संपूर्ण विश्वचषकातच आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या 10 षटकांमध्ये अत्यंत जबरदस्त फटकेबाजी करताना दिसला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजे करताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दहा शतकात फक्त 44 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी हळूहळू डाव सावरत 382 पर्यंत मजल मारली. डी कॉक, क्लासेन व डेव्हिड मिलर यांच्या योगदानामुळे त्यांनी अखेरच्या दहा षटकात तब्बल 144 धावा कुटल्या. या विश्वचषकात आतापर्यंत त्यांनी पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी केलेल्या चारही सामन्यात त्यांनी अखेरच्या दहा षटकात मोठ्या धावा फटकावल्या.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी आपल्या शेवटच्या दहा षटकांमध्ये 137 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील त्यांनी 79 धावा काढल्या. इंग्लंडविरुद्धच्या मागील सामन्यात त्यांनी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत तब्बल 143 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर आता या सामन्यातही त्यांनी तशीच कामगिरी करून दाखवली.
या सामन्यातील पहिल्या डावाचा विचार केल्यास डी कॉक याने 174 धावांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. कर्णधार ऐडन मार्करमने 60 व क्लासेनने 90 धावांचे योगदान दिले. या विश्वाच्या दक्षिण आफ्रिकेने चौथ्यांदा 300 पेक्षा जास्त धावा उभारल्या आहेत.
(South Africa Hits 144 Runs Against Bangaladesh In Last 10 Overs In World Cup Match)
हेही वाचा-
गंभीरने खोलली पाकिस्तानची पोल; सांगून टाकल्या 3 सर्वात मोठ्या कमकुवत बाजू, लवकर सुधराव्या लागतील…
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…