वनडे विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलियन संघाने 3 विकेट्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला. ऑस्ट्रेलियाला आता रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळायचे आहे. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य सामन्यात कडवे आव्हान दिले. पण नेहमीप्रमाणे याही वेळी उपांत्य सामन्यात त्यांना पराभव मिळाला.
दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही बलाढ्य संघांपैकी एक राहिला आहे. आफ्रिकी संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूही दिले आहेत. पण अद्याप हा संघ एकदाही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाहीये. 2023 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघ पाचव्यांदा उपांत्य सामन्यात पराभूत झाला. दक्षिण आफ्रिकेने वनडे विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिला उपांत्य सामना 1992 साली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी 252 धावा हव्या होत्या, पण आफ्रिकी संघ 232 धावांवर सर्वबाद झाला आणि 19 धावांनी पराभूत झाला. उपांत्य सामन्यात पराभवाचे हे सत्र सुरू झाले, जे अद्याप संपले नाही.
1999 साली दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला, जो सामना बरोबरीत सुटला होता. पण गुणतालिकेत वरच्या स्थानी असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात जागा पक्की केली. 2007 साली झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा अंतिम सामन्यात पोहोचला, पण यावेळीही त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. 150 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 31.3 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती. 7 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला होता.
2015 विश्वचषकातही दक्षिण आफ्रिक निराशाजनक पराभवाला सामोरे गेला. उपांत्य सामन्यात त्यांना न्यूझीलंडने 4 विकेट्स राखून पराभूत केले. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकी खेळाडूंच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते. यावर्षी विश्वचषकाच्या इतिहासात आफ्रिकी संघ पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला. पण यावेळीही त्यांना पराभवच मिळाला. ऑस्ट्रेलियन संघाने गुरुवारी (15 नोव्हेंबर) झालेल्या या सामन्यात आफ्रिकेला 3 विकेट्स राखून पराभूत केले. (South Africa lost in the World Cup semi-final for the fifth time)
विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका
पराभव विरुद्ध इंग्लंड (1992)
टाय विरुद्ध ऑस्ट्रेलिया (1999)
पराभव विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2007)
पराभव विरुद्ध न्यूझीलंड (2015)
पराभव विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2023)
कोलकाता स्थित ईडन गार्डन्स स्टेडियमवर यावर्षीच्या विश्वचषकातील हा दुसरा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 212 धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 215 धावा केल्या आणि अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला 70 धावांनी मात दिली होती.
महत्वाच्या बातम्या –
दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद
वर्ल्डकप फायनल भव्य बनवण्यासाठी तयारी सुरू! सामन्याआधी होणार एयर शो