---Advertisement---

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले असे काही…

---Advertisement---

साउथँम्पटन। बुधवारी(5 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात साउथँम्पटनमधील रोज बॉल स्टेडीयमवर पार पडलेल्या आठव्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. हा भारताचा या विश्वचषकातील पहिलाच विजय आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा हा या विश्वचषकातील सलग तिसरा पराभव आहे.

त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या तीन सामन्यात सलग पराभव स्विकारण्याची नामुष्की ओढावली आहे. याआधी कधीही दक्षिण आफ्रिका विश्वचषकातील पहिले तीन सामने सलग पराभूत झाले नव्हते.

2019 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना यजमान इंग्लंड संघाशी झाला होता. या सामन्यात त्यांना 104 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामना बांगलादेश संघाशी झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 21 धावांनी पराभव पत्करला. तसेच आता दक्षिण आफ्रिका तिसरा सामना भारताविरुद्ध पराभूत झाले आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचा थोडक्यात आढावा –

बुधवारी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 227 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक 42 धावा केल्या. तसेच फाफ डु प्लेसिस(38), डेव्हिड मिलर(31), फेहलुक्वायो(34) यांनी छोटेखानी खेळी केल्या. पण अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.

गोलंदाजीत भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दिलेले 228 धावांचे आव्हान भारताने रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 47.3 षटकात सहज पूर्ण केले. रोहितने 144 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत कागिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस मॉरिस आणि अँडील फेहलूक्वायोने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित शर्माच्या शतकामुळे भारताच्या नावावर झाला हा विश्वविक्रम

कर्णधार कोहलीने केले खास अर्धशतक, दिग्गज विव रिचर्ड्स यांनाही टाकले मागे

टॉप ५: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment