साउथँम्पटन। 2019 क्रिकेट विश्वचषकात बुधवारी आठवा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रोज बॉल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
त्याने या सामन्यात 144 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 23 वे शतक आहे. तसेच भारताचे हे वनडे विश्वचषकातील हे एकूण 26 वे शतक ठरले आहे.
त्यामुळे भारताने वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतक करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियानेही वनडे विश्वचषकात 26 शतके केली आहेत.
भारताची ही 26 शतके भारताच्या एकूण 13 खेळाडूंनी केली आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सर्वाधिक 6 शतके केली आहेत. तर सौरव गांगुलीने 4 शतके केली आहे.
त्याचबरोबर शिखर धवन, राहुल द्रविड, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 शतके विश्वचषकात केली आहेत. सुनील गावस्कर, अजय जडेजा, विनोद कांबळी, कपिल देव, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी 1 शतक केले आहे.
या संघांनी केली आहेत वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतके –
26 शतके – भारत / ऑस्ट्रेलिया
23 शतके – श्रीलंका
17 शतके – विंडीज
15 शतके – न्यूझीलंड
14 शतके – दक्षिण आफ्रिका / पाकिस्तान
13 शतके – इंग्लंड
2 शतके – बांगलादेश
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कर्णधार कोहलीने केले खास अर्धशतक, दिग्गज विव रिचर्ड्स यांनाही टाकले मागे
–टॉप ५: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम
–विश्वचषकाच्या पदार्पणातच युजवेंद्र चहलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश