दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातल पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-२ असा पराभव पत्करला. मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दक्षिण आफ्रिकेचा युवााा गोलंदाज मार्को जेन्सन (Marco Jensen) यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. या दोघांमध्ये कसोटी मालिकेत जरी वाद झाला असला, तरी ते मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळले आहेत आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. जेन्सनने यासंदर्भात स्वतः माहिती दिली आहे. त्याच्या मते बुमराहसोबत वाद झाला असला, तरी त्याविषयी त्याच्या मनात काहीच नाहीये.
कसोटी मालिकेतील विजयानंतर २१ वर्षीय जेन्सन दक्षिण अफ्रिका क्रिकेटच्या ट्वीटर हँडलवरून मीडियासोबत चर्चा करत होता. यावेळी तो म्हणाला की, “मी आयपीएलमध्ये बुमराहसोबत खेळलो आहे आणि आम्ही चांगले मित्र आहोत. जेव्हा तुम्ही स्वतःच्या देशासाठी खेळत असता, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांमुळे दडपणाखाली जाऊ इच्छित नसता. कधी कधी मैदानावर भावना बाहेर येतात.”
बुमराहसोबत झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना जेन्सन पुढे म्हणाला की, “त्याने देखील तशीच प्रतिक्रिया दिली आणि कोणाच्याच मनात कोणती वाईटा भावना नाही. त्याठिकाणी परिस्थितीच तशी होती. ही घटना अशा दोन खेळाडूंमध्ये घडलेली, ज्यांनी देशासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावत होते.”
दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत जरी विजय मिळवला असला तरी, १९ तारखेपासून त्यांना भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिका संघाने भारतीय संघाला हलक्यात घेतलेले दिसत नाही. आगामी मालिकेविषयी जेन्सन म्हणाला की, “आम्ही कसोटी मालिकेतील फॉर्म पुढे कायम ठेवण्याची आशा करत आहोत. पण आम्ही भारताला अजिबात कमी समजत नाही. आम्ही त्यांचा सामना करू इच्छितो.” एकदिवसीय मालिकेत जेन्सनला संघात संधी मिळाली असली, तरी त्याच्या स्वतःला याची अपेक्षा नव्हती. “मला संघात आत्ताच स्थान मिळणे अपेक्षित नव्हते. पण संघात निवडले गेल्यामुळे मी खूप खुश आहे आणि सन्मानित वाटत आहे,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार?
बिग बॅशमध्ये इतिहास घडणार! ‘हा’ भारतीय करणार पदार्पण; फिंचने दिली संधी
बंगाल-तेलगू सामन्याने पाहिली संयमाची परीक्षा; वॉरियर्स २८-२७ ने विजयी
व्हिडिओ पाहा –