आयपीएलच्या 14 व्या हंगामापुर्वी पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका मायदेशात मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलसाठी भारतात दाखल कधी होणार, हा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता त्यांच्या भारतात येण्याची तारीख निश्चित झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील बहुतेक खेळाडू एकदिवसीय मालिकेदरम्यान 4 एप्रिलनंतर भारतात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येतील. पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल संघाकडून त्यांच्या खेळाडूंना भारतात येण्याची व्यवस्था केली जाईल. दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानबरोबर 2 ते 16 एप्रिलदरम्यान तीन एकदिवसीय आणि चार टी20 आंतरराष्ट्रीय सामने मायदेशात खेळायचे आहेत.
क्रिकइन्फोच्या अहवालानुसार चार्टर्ड विमाने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आणण्यासाठी पूलिंग करू शकतील की नाही याचा अंदाज सध्या संघ घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या खेळाडूंना क्वारंटाईन राहण्याची गरज नाही, कारण ते आंतरराष्ट्रीय मालिका खेळत असल्याने आधीच बायो बबलमध्ये असतील. त्यामुळे त्यांना सात दिवसांच्या क्वारंटाईनमधून सूटका देण्यात आली आहे.
9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल लीगमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कगिसो रबाडा आणि एन्रीच नॉर्किए, मुंबई इंडियन्सचा क्विंटन डी कॉक, राजस्थान रॉयल्सचा डेव्हिड मिलर आणि चेन्नई सुपर किंग्जचा लुंगी एन्गिडी हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात येणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेने आयपीएलमध्ये खेळणार्या खेळाडूंना टी20 मालिकेपासून ब्रेक दिला आहे. 2 ते 7 एप्रिल दरम्यान होणार्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी रबाडा, डी कॉक, एन्गिडी, मिलर आणि नॉर्किए यांना संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु 10 ते 16 एप्रिलदरम्यान होणाऱ्या चार टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी त्यांना संघातून वगळण्यात आले आहे.
पाकिस्तानविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेचा भाग नसलेले दक्षिण आफ्रिकेचे काही खेळाडू आधीच भारतात दाखल झाले आहेत. तर काही खेळाडू लवकरच भारतात येतील. यात फाफ डू प्लेसिस, एबी डिविलियर्सचा समावेश आहे. फाफ आधीच भारतात आला असून तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे, तर डिविलियर्स लवकरच भारतात पोहचेल.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG 3rd ODI: इंग्लंडच्या शेपटाची झुंज अपयशी; भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका घातली खिशात
उडता कोहली! डाव्या हाताने विराटने घेतला राशिदचा अफलातून झेल, पाहून तुम्हीही म्हणाल ‘लाजवाब’






