दक्षिण आफ्रिकेनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रोमहर्षक विजयाची नोंद केली. यासह आफ्रिका 2025 जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे.
पाकिस्ताननं पहिल्या डावात 211 आणि दुसऱ्या डावात 237 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 301 आणि दुसऱ्या डावात 150 धावा करत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करमनं दमदार कामगिरी केली. तर कागिसो रबाडानं फलंदाजीत कमाल दाखवत संघाला विजय मिळवून दिला.
पाकिस्ताननं पहिल्या डावात 211 धावा केल्या होत्या. संघाकडून बाबर आझम आणि शान मसूद यांच्यासह अनेक मोठे खेळाडू फ्लॉप झाले. कामरान गुलामनं 54 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही संघ 237 धावा करून ऑलआऊट झाला. सौद शकीलनं दुसऱ्या डावात आपली ताकद दाखवत 84 धावा केल्या. बाबर आझमनं 50 धावांची खेळी केली. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकलं नाही.
दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 301 धावा केल्या. यादरम्यान एडिन मार्करमनं 89 धावांची खेळी केली. त्यानं 15 चौकार मारले. कॉर्बिन बॉशनं 81 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानं 15 चौकार मारले. दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात एकवेळ 99 धावांवर 8 विकेट गमावल्या होत्या. मात्र कागिसो रबाडा आणि मार्को यानसेन यांनी संघाला तारलं. रबाडानं नाबाद 31 धावा केल्या. तर यानसेननं नाबाद 16 धावा केल्या. त्यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 2 गडी राखून जिंकला. या विजयासह संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
हेही वाचा –
बुमराहसारखा दुसरा कोणीच नाही! मेलबर्न कसोटीत केले हे 5 मोठे रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियन मीडियानं केला विराट कोहलीचा घोर अपमान, ट्रोलिंगच्या सर्व मर्यादा पार
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ ऑल-आऊट झालेला, पण यामुळे कांगरुंचे नशीब पालटले