इंग्लंड विरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे संघातून बाहेर पडला.
रबाडाला तीन आठवड्यांसाठी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्याला जैव सुरक्षित वातावरणातून मुक्त करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने सांगितले की, रबाडाला पुनरागमन करण्यासाठी हा कालावधी निश्चित केला आहे. त्याला डिसेंबरच्या शेवटी सुरू होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी स्वतःला चांगले तयार करावे लागेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात वनडे मालिका
केपटाऊनमध्ये 4 डिसेंबर पासून इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. रबाडा दक्षिण आफ्रिका संघासाठी गोलंदाजीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतो. वेळोवेळी त्याने स्वतःला मैदानावर सिद्ध केले. आयपीएल 2020 मधील त्याच्या नवीन फॉर्मबद्दल बोलायचे, तर त्याने आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या मोसमात दिल्ली कॅपिटल संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फायनलमध्ये पोचवले. त्याचबरोबर त्याने भेदक गोलंदाजी करताना 30 बळी टिपले. त्यामुळे पर्पल कॅपचा मानकरी म्हणून त्याची निवड झाली होती.
डेविड मलान ठरला मालिकावीर
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेबद्दल बोलायचे, तर यजमान संघ पूर्णपणे प्रत्येक क्षेत्रात वरचड ठरला होता. ते शेवटच्या टी-20 सामन्यात इंग्लंडकडून 9 विकेट्सने पराभूत झाले होते. दुसर्या टी-20 सामन्यात ऑयन मॉर्गनच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 4 विकेट्सने पराभूत केले होते. त्याचबरोबर सुरुवातीच्या सामन्यात इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेला 5 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. बॅटने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे मालन याला मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई