दक्षिण आफ्रिकेनं आगामी टी20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. आफ्रिकेनं एडन मार्करमला कर्णधार बनवलंय. तो सध्या आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. आफ्रिकेनं 15 सदस्यीय संघाव्यतिरिक्त दोन खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश केला आहे.
आफ्रिकन संघात अशा अनेक खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय, जे सध्या खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला संघात संधी मिळाली आहे. तो 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात देखील संघाचा भाग होता. हा वेगवान गोलंदाज आयपीएलच्या चालू हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
आफ्रिकेनं टी20 विश्वचषकासाठी निवडलेला संघ अतिशय संतुलित दिसत आहे. संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंचा चांगला मेळ आहे. संघात कर्णधार एडन मार्करम, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा आणि तबरेझ शम्सी या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
टी20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्ज
राखीव खेळाडू – नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी
2024 टी20 विश्वचषक 1 जूनपासून सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका सोमवार, 3 जूनपासून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. आफ्रिकेचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा ‘ड’ गटात समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याला बसू शकतो धक्का, टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा उपकर्णधार
‘ड्रॉप-इन खेळपट्टी’वर खेळला जाणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या काय आहे खासियत