---Advertisement---

पाकिस्ताननंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलियाने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट; चौथ्या स्थानासाठी भारतासह ‘हे’ २ संघ शर्यतीत

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 10:31 AM
---Advertisement---

शनिवारी (०७ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने १० धावांनी विजय मिळवला. परंतु त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले आहे. यासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून पाकिस्तान, इंग्लंडनेही पूर्वीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. यानंतर आता चौथे स्थान मिळवण्यासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगानिस्तान या तीन संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. रविवारी (७ नोव्हेंबर ) होणाऱ्या अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर चौथा संघ कोण असेल याचा निकाल लागू शकतो.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला असून सुद्धा त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे, दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी हा सामना मोठ्या अंतराने जिंकायचा होता. परंतु असे करण्यात दक्षिण आफ्रिका संघ अपयशी ठरला.

काय आहे उपांत्य फेरीचे समीकरण?
ग्रूप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाचे ८ – ८ गुण आहेत. परंतु इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. इंग्लंडचा रनरेट +२.४६४ आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा रनरेट +१.२१६ आणि दक्षिण आफ्रिका संघाचा रनरेट +०.७३९ आहे.

तर ग्रूप-२ मधून पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि भारत या तिन्ही संघामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालावर हा संघ ठरेल. जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तानसह भारतही प्रबळ दावेदार असेल. नेट रन रेटवर त्यांचा प्रवेश अवलंबून असेल. तर न्यूझीलंडने सामना खिशात घातल्यास, हा संघ उपांत्य फेरीत जाईल.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सामन्याची अशी झाली लढत
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रासी वान दर दुसेनने नाबाद ९४ धावांची खेळी केली. तर एडेन मार्करमने नाबाद ५२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला २० षटक अखेर २ बाद १८९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून मोईन अलीने ३७ तर डेविड मलानने ३३ धावांचे योगदान दिले. परंतु त्यांना दिलेले आव्हान गाठता आले नाही. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने १० धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

तीन संघांचे भविष्य एका सामन्यावर ठरणार; जाणून घ्या अफगानिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही

AFG v NZ : ‘निकाल काहीही येवो..’ अमिताभ यांच्या ट्विटमुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या विचारांत बदल

कागिसो रबाडाने रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध २०व्या षटकात घेतली ‘हॅट्रिक’, विक्रमांची घातली रास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---