पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात नुकतीच ३ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. आता या मालिकेनंतर उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. कसोटी मालिका विजयातून प्रेरणा घेत यजमान दक्षिण आफ्रिका संघ वनडे मालिकेतही चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने उतरेल, तर भारतालाही कसोटी मालिकेतील पराभव विसरून वनडे मालिकेत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
केएल राहुल असणार कर्णधार
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीकडून भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्यामुळे, त्याच्याऐवजी वनडे संघाचा रोहित शर्माला नियमित कर्णधार आणि केएल राहुलला नियमित उपकर्णधार करण्यात आले होते. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येण्यापूर्वी रोहित दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केएल राहुलकडे भारतीय संघाचे प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले. तसेच जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले.
त्याचबरोबर अनेक वर्षांनंतर विराट कोहली या मालिकेतून केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. तसेच आर अश्विन, शिखर धवन, युजवेंद्र चहल यांचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
असा आहे आमने-सामने इतिहास
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत ८४ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ३५ सामन्यात भारताने विजय मिळवला असून ४६ सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. तसेच यातील ३४ सामने दक्षिण आफ्रिकेत झाले असून भारताने १० सामने जिंकले आहेत आणि २२ सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
पण, भारतासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताने यापूर्वी २०१८ मध्ये केलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत ५-१ अशा फरकाने विजय मिळवला होता.
अधिक वाचा – वनडे मालिकेसाठी सरावाला लागला भारतीय संघ, कसोटी मालिकेचा वचपा काढण्यावर असेल ‘राहुलसेने’ची नजर
अशी होणार आहे मालिका
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होणारी वनडे मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार असून २१ आणि २३ जानेवारीला मालिकेतील अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना खेळवला जाणार आहे.
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत पहिल्या वनडे सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना केव्हा होणार?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना १९ जानेवारी २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना कुठे खेळवला जाणार?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळवला जाईल.
३. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरु होणार?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.०० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी १.३० वाजता नाणेफेक होईल.
४. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
दक्षिण आफ्रिका – तेंबा बावुमा (कर्णधार), झुबेर हमझा, जानेमन मलान, ए़डेन मार्करम, डेव्हिड मिलर, रॅसी वॅन डर ड्युसेन, मार्को यान्सेन, वेन पार्नेल, अँडिले फेहलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, क्विंटन डी कॉक, काइल वेरेन, केशव महाराज, सिसांडा मगाला, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तब्राइझ शम्सी.
भारत – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी
महत्त्वाच्या बातम्या –
संघहितासाठी ‘कॅप्टन राहुल’ने केला आपल्या जागेचा त्याग; वनडे मालिकेत ‘या’ स्थानी करणार फलंदाजी
“दोन वर्षांसाठी रोहित किंवा अश्विनला कर्णधार करा, म्हणजे योग्यवेळी पंतच्या हाती संघाची सूत्रे येतील”
पाकिस्तानला मिळाला रिजवानचा उत्तराधिकारी!! विश्वचषकात १० चौकारांसह चोपल्यात १३५ धावा