क्रिकेटची लोकप्रियता आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. क्रिकेटमधील स्पर्धा पाहता अनेक खेळाडूंना क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळते तर, काहींना यापासून मुकावे लागते. त्यामुळे अनेक खेळाडू आपला देश सोडून दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी जातात. अशीच एक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू डेव्हिड वीज, आता आगामी टी-२० स्पर्धेमध्ये नामिबिया या देशाकडून खेळणार आहे.
विजने २०१७ साली दक्षिण आफ्रिका संघातून निवृत्ती घेतली होती. विज सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स या संघाकडून खेळत आहे. त्याचबरोबर इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा वीज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला आहे.
श्रीलंकाविरुद्ध २०१३ साली वीजने दक्षिण आफ्रिका संघाकडून टी-२० मध्ये पदार्पण केले होते. वयाच्या ३६ व्या वर्षी विजने ‘कॉलपॅक’ करारावर हस्ताक्षर केले होते, ज्याद्वारे तो काउंटीमधील ससेक्स क्रिकेट क्लब या संघाशी जोडला गेला होता. या करारामुळे वीज दक्षिण आफ्रिका संघाकडून क्रिकेट खेळू शकत नव्हता. याच कारणामुळे त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातून निवृत्ती घेतली होती.
विजपूर्वी, शुक्रवारी (१३ ऑगस्ट) भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने देखील क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. आता तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. चंदने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १११ धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. यानंतर त्याला भारतीय संघात जास्त संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आधी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने ही स्पर्धा यूएईला करण्याचे ठरवले. यासाठी सर्व संघाची जोरदार तयारी चालू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
–नुकताच साखरपुडा झालेल्या श्रेयसच्या होणाऱ्या पत्नीचे राहुलशी आहे ‘हे’ नाते, पार्टींमध्ये होत असते भेट
–युवा यष्टीरक्षक ईशानला धोनीकडून शिकायची आहे ‘ही’ गोष्ट, स्वत:च केला खुलासा
–रूटची गाडी सुसाट! ९००० कसोटी धावा करताना केली ‘ही’ दैदिप्यमान कामगिरी; तेंडुलकरलाही टाकले मागे






