---Advertisement---

वय केवळ २६ वर्षेे; किडनी, लिव्हर झालेत फेल आता कोरोना पॉझिटिव्हही आढळला हा क्रिकेटर

On: शुक्रवार, मे 8, 2020 2:08 PM
---Advertisement---

चारही दिशांनी संकट येण्याचा प्रत्यय सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू सोलो एनक्वेनी घेत आहे. तो गुलियन बेरे सिंड्रोमचा (Guillan-Barre syndrome) मागीलवर्षांच्या जूलैपासून सामना करत आहे. त्याचबरोबर त्याला अन्यही काही आजार आहेत आणि आता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

याबद्दल एनक्वेनीने ट्विटरवर माहिती दिली आहे. त्याने लिहिले, ‘मला गेल्या वर्षी जीबीएस झाल्याचे निदान झाले. मी या रोगाशी १० महिन्यांपासून लढा देत आहे. मी जवळजवळ अर्धा बरा झाल्यावर मला टीबी झाला होता. त्यामुळे माझे यकृत आणि मूत्रपिंड खराब झाले आहे आणि आता मी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे सर्व माझ्याबरोबर का घडत आहे हे मला समजत नाही.’

मागीलवर्षी एनक्वेनी स्कॉटलंडमध्ये असताना ४ आठवड्यासाठी कोमात गेला होता. विशेष म्हणजे या आजाराशी लढणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे. याआधी गुलियन बेरे सिंड्रोमचा आजार पाकिस्तानच्या जफर सरफराज आणि स्कॉटलंडच्या माजिद हकला झाला होता.

एनक्वेनी २०१२ ला दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. तसेच तो फ्रँचायझी क्रिकेटही खेळला आहे.

एनक्वेनीच्या आरोग्यामध्ये मागील वर्षी ऑक्टोबरपर्यंत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्याला पुन्हा दक्षिण आफ्रिकेला जाण्याची परवानगीही दिली होती. परंतू त्यांच्या कुटुंबासाठी प्रवासाचा खर्च खूपच जास्त होता. त्यामुळे GoFundMe मोहीम सुरू केली गेली. त्याद्वारे ३,१२५ पाऊंड्स गोळा करण्यात आले. तसेच एका देणगीदाराने ७६,८७५ पाऊंड्स दिले.

जानेवारीमध्ये एनक्वेनी जोहान्सबर्गला आला होता. तिथे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार सुरु झाले होते. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिका संघानेही त्याच्या उपचारासाठी अर्थिक मदत दिली.

त्याने आत्तापर्यंत ३६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने ७३५ धावा आणि ६० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ४४ अ दर्जाच्या सामन्यांत ४२६ धावा केल्या आहेत, तर ४६ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

टेनिसपटू सानिया मिर्झाचे आहेत या क्रिकेट कर्णधारांशी कौटुंबिक संबंध

लाडक्या लेकीने बनवलेला खास पदार्थ सचिन तेंडुलकरने केला काही सेंकदातच फस्त!

कॅप्टनकूल धोनी म्हणतो, ‘मलाही दबाव येतो, मला पण भीती वाटते’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---