मुंबई । भारतीय संघ वगळता सर्व संघांमध्ये बहुधा एक खेळाडू असा असतो जो दुसर्या देशात जन्मलेला असून आणि दुसर्या देशासाठी क्रिकेट खेळलेले असते. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन आयर्लंडचा, बेन स्टोक्स हा न्यूझीलंडचा तर वेस्ट इंडिजचा जोफ्रा आर्चर, दक्षिण आफ्रिकेचा जेसन रॉय हे इंग्लंड संघाकडून खेळतात. केवळ इंग्लंडच नाही तर इतर संघातही विदेशी खेळाडू खेळत आहेत किंवा खेळले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघातही अशीच परिस्थिती आहे, ज्यात लाहोरमध्ये जन्मलेला अनुभवी फिरकीपटू इमरान ताहिर दक्षिण आफ्रिकाकडून खेळत आहे. पाकिस्तानात जन्म असूनही त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी जवळपास एक दशकासाठी क्रिकेट खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठीही ते टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत आहे, परंतु आता त्यांने याचा खुलासा केला आहे की, त्याला पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळल्याबद्दल दु:ख वाटत आहे.
त्याने अनेक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटची चांगली सेवा केली आहे, परंतु लाहोरमध्ये जन्मलेला लेगस्पिनर इम्रान ताहिर त्याच्या सुरुवातीच्या वर्षांत येथे खेळूनही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी न मिळाल्याने निराश झाला आहे. ताहिर दक्षिण आफ्रिकेला गेला आणि त्याने राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास सुरवात केली, तसेच जगभरातील टी -20 लीगमधील विविध फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले, पण तरीही पाकिस्तानकडून न खेळण्याचा त्याला राग आहे.
इम्रान ताहिर यांनी ‘जीओ सुपर’ शी बोलताना सांगितले की, “मी लाहोरमध्ये क्रिकेट खेळायचो आणि ज्यांच्यासाठी मी खेळायचो त्यात मी मुख्य भूमिका निभावत असे. मी जास्तीत जास्त क्रिकेट पाकिस्तानमध्ये खेळलो, पण इथे मला संधी मिळाली नाही, ज्यामुळे मी निराश आहे. ”
दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी, 41 वर्षीय ताहिर पाकिस्तान अंडर -19 आणि पाकिस्तान ‘अ’ संघांकडून खेळला. त्याची पत्नी सुमैया दिलदार हिच्यामुळेच तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला.
तो म्हणाला की, “पाकिस्तान सोडणे कठीण होते, परंतु देवाने मला आशीर्वाद दिला. दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचे बहुतेक श्रेय माझ्या पत्नीला जाते.”
इम्रान ताहिरने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून 20 कसोटी सामन्यात 57, 107 वनडेत 173 आणि 38 टी 20 मध्ये 63 बळी घेतले आहेत. गेल्या वर्षी विश्वचषक संपल्यानंतर त्याने आपल्या वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.