इंग्लंडमध्ये सध्या टी20 ब्लास्ट लीग सुरु आहे. या स्पर्धेमध्ये काल(7 ऑगस्ट) लेसेस्टरशायर विरुद्ध वारविक्शायर संघात सामना पार पडला. या सामन्यात लेसेस्टरशायरने 55 धावांनी विजय मिळवला. या विजयात लेसेस्टरशायरचा कर्णधार कॉलिन एकर्मनने 7 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला.
दक्षिण आफ्रिकेचा असणाऱ्या एकर्मनने या सामन्यात गोलंदाजी करताना 4 षटकात 18 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. यामुळे तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला आहे.
त्याने या सामन्यात मायकेल बर्गेस, सॅम हेन, विल रोड्स, लियाम बँक्स, अॅलेक्स थॉमसन, हेन्री ब्रूक्स आणि जीतन पटेल यांना बाद केले.
याआधी ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम मलेशियाच्या अरुल सुप्पीयाच्या नावावर होता. त्याने 2011 ला सोमरसेटकडून ग्लॅमॉर्गनविरुद्ध खेळताना 5 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
एकर्मनने काल सामना संपल्यानंतर त्याच्या कामगिरीबद्दल म्हटले की ‘हा सामना पुढे बराच काळ मी लक्षात ठेवेल.’
या सामन्यात लेसेस्टरशायरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 189 धावा केल्या होत्या आणि वारविक्शायरला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना वारविक्शायरचा संघ 17.4 षटकात 134 धावांवर सर्वबाद झाला.
ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन-
18 धावांत 7 विकेट्स – कॉलिन एकर्मन (लेसेस्टरशायर विरुद्ध वारविक्शायर, 2019)
5 धावांत 6 विकेट्स – अरुल सुप्पीया (सोमरसेट विरुद्ध ग्लॅमॉर्गन, 2011)
6 धावांत 6 विकेट्स – शाकिब अल हसन (ट्रीडेन्ट्स विरुद्ध रेड स्टिल, 2013
7 धावांत 6 विकेट्स – लसिथ मलिंगा (मेलबर्न स्टार्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स, 2012)
7 धावांत 6 विकेट्स – काईल जेमीसन (कॅन्टरबरी विरुद्ध ऑकलँड, 2019)
0️⃣3️⃣4️⃣W0️⃣1️⃣0️⃣1️⃣1️⃣1️⃣1️⃣1️⃣W2️⃣W0️⃣W0️⃣W1️⃣1️⃣W1️⃣W
Colin Ackermann takes 7/18 – the best bowling figures in T20 history
➡️ https://t.co/afo2WOG7iX pic.twitter.com/BLgpf0H2F1
— Vitality Blast (@VitalityBlast) August 7, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर
–ख्रिस गेल-विराट कोहलीमधील ही शर्यत जिंकणार कोण?
–‘डुबकी किंग’ परदीप नरवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा