नुकतेच निवड झालेल्या भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात कोणत्याही संघावर तात्काळ प्रभाव पाडण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अधिक मजबूत होईल. असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स याने व्यक्त केला आहे.
वास्तविक जाॅन्टी रोड्सने पीटीआयशी बोलताना एका व्हिडिओमध्ये सांगितले की, गंभीर जिथे जातो तिथे प्रभाव पाडतो.लखनऊ सुपर जायंट्स सोडून कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाल्यावर त्याने कसा झटपट प्रभाव पाडला हे आम्ही पाहिलेच आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला, गाैतम गंभीर एक अतिशय व्यावहारिक व्यक्ती आहे. त्याला काय करायचे आहे हे माहित आहे. तो नेहमी त्याच्या मनाचे ऐकतो, गंभीर त्याच्या कामात कोणतीही कसर सोडत नाही आणि त्याच्यामुळे भारतीय संघ अधिक मजबूत होईल. भविष्यात भारतीय संघ गाैतम गंभीरच्या प्रशिक्षणात आधिक परिपक्व होईल.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. टीम इंडियाने श्रीलंकेत टी-20 मालिकेत 3-0 ने विजय मिळवला, मात्र एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेकडून भारताला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे, तिथे गौतम गंभीरची खरी परीक्षा असणार आहे.
रोड्स हा लखनऊ संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. दरम्यान आता लखनऊने संघाचा मार्गदर्शक म्हणून झहीर खानची नियक्ती केली. ज्यावर तो म्हणाला, आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये तुम्हाला थंड डोक्याच्या लोकांची गरज असते. अशा परिस्थितीत जॅक (झहीर) सारखा खेळाडू संघात असणे म्हणजे टीमचा फायदाच आहे. आगामी आयपीएल हंगामीसाठी उत्सुक आहे.
हेही वाचा-
आश्चर्यकारक! 21 वर्षाच्या कारकीर्दीत ‘या’ खेळाडूनं कधीच नाही फेकला NO-BALL
हीच पाकिस्तानची ओळख! अशी कॅच सोडली, ज्यावर अंपायरचाही विश्वास बसेना
एकेकाळी संघाचा घातक गोलंदाज,आता खाजगी कंपनीत नोकर; दिग्गज क्रिकेटपटूची व्यथा